On five and a half thousand hectares Summer soybean sowing
On five and a half thousand hectares Summer soybean sowing 
मुख्य बातम्या

साडेपाच हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन पेरणी

टीम अॅग्रोवन

परभणी ः ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत परभणी जिल्ह्यात कृषी विभागास यंदाच्या उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणीसाठी २ हजार २०० हेक्टरचा इष्टांक देण्यात आला. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात ५ हजार ६२५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली. त्यामुळे येत्या खरिपात पेरणीसाठी शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन बियाणे उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात गतवर्षी (२०२१) उन्हाळी हंगामात जिल्ह्यात बीजोत्पादनासाठी सोयाबीनची ८२७.९५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले. घरची गरज भागून अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांची विक्री केली. चांगले दर मिळाल्याने फायदा झाला. २०२१ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पावसात भिजले. त्यामुळे बियाण्यामध्ये उगवण शक्तीची समस्या येऊ शकते. आगामी खरिपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे घरचे दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे. यासाठी यंदाच्या कृषी विभागास २ हजार २०० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा इष्टांक देण्यात आला.

सिंचनाची पुरेशी सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर पेरणी केली आहे. त्यामुळे इष्टांक क्षेत्राच्या सुमारे अडीचपट क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. २०२१ मधील खरीप हंगामात ग्राम बीजोत्पादन नियोजनानुसार जिल्ह्यातील ४८ हजार ९४ शेतकऱ्यांच्या १६ हजार २८३ हेक्टर क्षेत्रावर २ लाख ५२ हजार ५८ क्विंटल बियाणे उत्पादनाचा इष्टांक आहे. प्रत्यक्ष राखून ठेवलेला बियाणे साठा २ लाख ४८ हजार ६०० क्विंटल आहे. येत्या (२०२२) खरीप हंगामात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात १० टक्के वाढ गृहित धरुन कृषी विभागाने केलेले सुधारित नियोजित क्षेत्र २ लाख ७७ हजार २६४ हेक्टर आहे. वाढीव नियोजित क्षेत्राची बियाण्याची गरज भागविण्यासाठी उन्हाळी हंगामातून बियाणे उपलब्ध होऊ शकेल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT