शेतकरी प्रतिक्रिया
शेतकरी प्रतिक्रिया 
मुख्य बातम्या

माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे प्रदर्शन पाहून समाधान झाले...

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद ः गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात संपूर्ण मराठवाडा, खानदेश, विदर्भाच्या काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. मराठवाड्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन बघितल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मी साडेचार एकर शेती करतो. डाळिंब, कपाशी, मका, बाजरी अशा प्रकारची पीके घेतो. आता काळानुसार पूरक व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी माझे समाधान करणारी माहिती कृषी प्रदर्शनातून मिळाली. चांगल्या प्रकारचे आयोजन, नियोजन करण्यात आले होते. माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे हे प्रदर्शन पाहून समाधान झाले. - गणेश कोलते, फुलंब्री, जि. औरंगाबाद

आम्ही जुन्या पिढीतील शेतकरी असलो तरी नवीन ज्ञान काय मिळेल या उद्देशाने येथे आलो होतो. घरची तीन एकर शेती असून ती कोरडवाहू आहे. कापूस, बाजरा घेतो. दुष्काळी परिस्थितीत पिकांनी यावर्षी दगा दिला. तरी हार मानलेली नाही. प्रदर्शनात प्रत्येक दालनाला भेट दिली. चांगली माहिती मिळाली. याचा मुलाला शेतीत उपयोग करण्यास सांगेल. - सखाराम चिंचखेडे, जामखेड, जि. औरंगाबाद

माझ्याकडे साडेनऊ एकर शेती आहे. शेतीसोबतच आम्ही शेळीपालन करतो. नवजात पिल्लांना दूध पाजण्यासाठी काही नवीन तंत्र आहे का, याची माहिती हवी होती. ती व इतर माहिती घेण्याच्या उद्देशाने प्रदर्शन बघण्यासाठी आलो. अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन अावर्जून पाहले पाहिजे, असे आहे. पूरक व्यवसायांची माहिती येथे मोठ्या प्रमाणात आहे. - पठाण सरवर खान, गवळी धानोरा, ता. गंगापूर जि. औरंगाबाद

आमच्या भागात यंदा दुष्काळ आहे, त्यामुळे संत्रा बाग वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनासाठी आलो आहे. गट शेतीचे अनेक फायदे, कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाबाबत परिसंवादामध्ये सविस्तर माहिती मिळाली. अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गावाकडील शेतकरी मिळून आलो आहोत - विष्णू निर्वळ, रुढी, ता. मानवत, जि.परभणी

पंधरा एकर शेती आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कृषी प्रदर्शनामध्ये कमी पाण्यावर घेता येणार्या पिकांची माहिती मिळाली. डाळिंब बाग वाचविण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. शेतक-यांनी कृषी प्रदर्शन पाहायला जाणे जरूर आहे. - बळिराम पागिरे, जामखेड, ता. अंबड, जि. जालना

शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गटांच्या माध्यमातून बियाणे उत्पादन घेत आहोत. गटशेती ही काळाजी गरज आहे. कृषी प्रदर्शनातील यांत्रिकरणाच्या दालनामध्ये नवीन कृषी अवजारांची माहिती मिळाली. शेतक-यांसाठी हे प्रदर्शन दिशा देणारे आहे. - अनंत पाटील,  जवळा बुद्रुक, ता. सेनगांव, जि. हिंगोली

सात एकर शेती आहे. हंगामी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असतो. कृषी प्रदर्शनामध्ये भाजीपाल्यांच्या नवीन बियाणाची माहिती मिळाली. कमी पाण्यावरच्या फळपिकांची माहिती मिळाली. यामुळे येत्या काळात निश्चितच फायदा होणार आहे. - गोसोनाजी इंगोले,  जवळा बुद्रुक, ता. सेनगांव, जि. हिंगोली

पाच एकर शेती आहे. हळद,  सोयाबीन, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असतो. अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनामध्ये नवीन कृषी अवजारे, धान्य स्वच्छ करण्याचे मशिन, भाजीपाला बियाणे, प्रक्रिया उद्योग, पाणी व्यवस्थापनाची माहिती मिळाली. - रामप्रसाद इंगोले, जवळा बुद्रुक, ता. सेनगांव, जि. हिंगोली.

परभणी पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत. गावाकडे ५० एकर शेती आहे. पारंपरिक पीकपद्धतीला फळबागेची जोड द्यायची आहे. फळबाग लागवडीसाठी दर्जेदार रोपे विकत घ्यायची आहेत. अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनामध्ये रोपवाटीकसह शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध कृषी अवजारांची माहिती मिळाली.  - एस. डी. देशमुख, चारठाणा, ता. जिंतूर, जि. परभणी यांत्रिकीकरणाची सोबतच सेंद्रिय शेती आणि प्रक्रिया उद्योगाची इत्थंभूत माहिती या कृषी प्रदर्शनात आल्यामुळे मिळाली. ही माहिती आणि ज्ञानाचा मी माझ्या शेतीत उपयोग करून घेईल. - केशव पवार, माजलगाव, जि. बीड

सकाळ ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात आल्याने सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचं कळलं सोबतच आधुनिक शेती शेडनेट पॉलिहाउस याविषयीही माहिती मिळाली. - ज्ञानेश्वर मोरे,  बादापूर, ता. येवला, जि. नाशिक 

माझा भाऊ गावाकडे शेती करतो. मला शेतीविषयी कृषी प्रदर्शन भरल्याचे कळलं. लगेच मी प्रदर्शन पाहायला आलो. आता इथं मिळालेली माहिती माझ्या भावाला सांगून त्याची शेती सुकर करण्याचा प्रयत्न करीन. - काशिनाथ गिरी,  जांभरुन ता. जिंतूर, जि. परभणी 

आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार सुरू आहे त्या विचाराला अनुसरून माहिती घेण्यासाठी सकाळ ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात आलोय बऱ्याच अंशी माझी आणि आधुनिक शेती विषयीची माहिती मला मिळाली. - राजू शिकारे, लासुरा ता. अंबड जि. जालना

दहा एकर शेती आहे. कपाशी तूर भाजीपाला इतर पीक या शेतीमध्ये घेतो. शेतीतला खर्च कमी करायचा असेल तर शेती सेंद्रिय पद्धतीने केल्याशिवाय पर्याय नाही हे कळलं. सेंद्रिय शेतीचे उत्पादन कसे घ्यायचे याची माहिती शेतकरी देताहेत सोबतच उत्पादित केलेला माल आपण कशा पद्धतीने विकू शकतो. याचेही ज्ञान सकाळ ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात आल्याने थेट शेतकऱ्यांकडून मिळाले. - विठ्ठल कदम, देऊळगांव गात, ता. सेलू, जि. परभणी

सकाळ ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात आल्याने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानात भर पडली. मी ॲग्रोवनचा पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. कृषी तंत्रज्ञानातील नव्याने झालेला प्रोग्रेस निदर्शनास आला त्याचा निश्चितच उपयोग होईल. विविध प्रकारच्या कलमांच्या कलम चारापीक याचीही माहिती मिळाली. प्रचंड मोठा बैल पाहून तितकाच जास्त आनंद झाला. - निळकंठ झोपे, वरणगाव ता. भुसावळ, जि. जळगाव आम्ही नांदेड जिल्ह्यातील वाई येथून चौघे जण सकाळीच प्रदर्शनासाठी निघालो. आम्ही फळबागा, तेलमशिन, टॅक्टर, यंत्रे बघितली. नवीन माहिती मिळेल या उद्देशाने आलो. प्रत्येक दालनाला भेट दिली. तो उद्देश सफल झाला. खूप चांगली माहिती मिळाली. ठिकठिकाणी आम्हाला दालनधारकाने माहिती दिली. - वसंत कवळे, केशव ढगे, प्रमोद पवार, विवेक आनंद आबादार,  वाई ता. मुदखेड, जि. नांदेड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT