तूर काढणी
तूर काढणी 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यात तुरीचे पीक घेतले जाते. येथे तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.शेतकरी बाजारात तूर विक्रीसाठी येऊ लागले आहेत. सुरवातीच्या काळात तुरीला चार हजार रुपये प्रति क्विंटल असा दर होता. शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकऱ्यांना २५०० ते ३६०० रुपये क्‍विंटल दराने तुरीची विक्री करावी लागते आहे. यामुळे तूर पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाची कमतरता यामुळे तुरीच्या क्षेत्रात घट झाली. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी तूर पीक काढून टाकले होते. सध्या जत तालुक्‍यात तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्याच हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता तूर काढणीचा हंगाम सुरू होण्याअगोदर शासकीय खरेदी केंद्र सुरू होणे आवश्‍यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आजमितीस तुरीच्या विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांचा आधार घेत आहेत. शेतकऱ्यांकडील तूर विक्री करून झाल्यानंतर खरेदी केंद्र सुरू केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा उपयोग होत नाही. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच तूर खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले तरच तुरीचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार नाही. तुरीला सुरवातीला ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्याच तुरीला आज अडीच हजार ते तीन हजार सहाशे असा दर मिळतोय. खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी फायदा घेत तुरीचे दर पाडताहेत. 

गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. याचा फटका तूर पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. गेल्यावर्षी एकरी ९ ते दहा क्विंटल उत्पादन मिळत होते. मात्र, यंदाच्या हंगामात ५० किलोच्या तीन ते चार पोत्यांचे उत्पादन मिळतेय. तुरीला दर नसल्याने या पिकाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT