पन्नास कोटींच्या पीककर्ज वसुलीस स्थगिती
पन्नास कोटींच्या पीककर्ज वसुलीस स्थगिती 
मुख्य बातम्या

सांगलीत पन्नास कोटींच्या पीककर्ज वसुलीस स्थगिती

टीम अॅग्रोवन

सांगली : दुष्काळामुळे जिल्ह्यातील २१ हजार १४९ शेतकऱ्यांचे ४९ कोटी ६५ लाख रुपयांचे यावर्षीच्या पीककर्ज वसुलीस स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्या शिवाय २ लाख ५८ हजार शेतकऱ्यांची महसुलाची रक्कम माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती व टंचाई निवारणार्थ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीत घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ५ तालुक्यांतील ६० गावे व ३४३ वाड्यावस्त्यांवर ५२ टँकर सुरू आहेत. जिथे आवश्यकता आहे आणि निकषांमध्ये बसतात, तेथे टँकर सुरू करण्यात येत आहेत. टँकर सुरू असलेल्या ठिकाणी मी स्वतः तपासणी करणार आहे. पाण्याचे टँकर भरले जाणार आहेत, ती ठिकाणे जवळची असावीत.’’ 

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ४७६ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित केलेली नाही. एक लाख ५५ हजार ७७० शेती पंप ग्राहकांना ३३.५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांची बिले येत्या १५ दिवसांत आकारण्यात येणार आहेत. कृषी पंपांची वीज खंडित करण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.  

ते म्हणाले, जिल्ह्यातील २ लाख ५८ हजार शेतकऱ्यांचे १५ लाख ३७ हजार रुपये जमीन महसुलाची रक्कम शेतकऱ्यांना माफ करावी. तशी नोंद ८ ब मध्ये स्पष्टपणे घेण्यात यावी. दुष्काळ घोषित गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क दि. ३१ ऑक्टोबर २०१८ पासून शासनाने माफ केले आहे. जिल्ह्यातील ११ वी - १२ वीच्या २९ हजार ७९२ विद्यार्थ्यांना १ कोटी १८ लाख १७ हजार ४९५ रकमेचे शिक्षण शुल्क माफ करण्यात येणार आहे.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना जिल्ह्यात ५ तालुक्यांत ५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. तसेच आवश्यक व निकषांत बसणाऱ्या ठिकाणी टँकर सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. तर आरक्षित पाणी स्रोतांच्या ठिकाणी अनधिकृत उपसा केल्यास वीज खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT