खानदेशात खत खरेदी रोडावली
खानदेशात खत खरेदी रोडावली 
मुख्य बातम्या

खानदेशात खत खरेदी रोडावली

टीम अॅग्रोवन

जळगाव : रब्बीचा पेरा हवा तेवढा नसल्याने खानदेशात रासायनिक खतांची मागणी कमी असून, मागील वर्षाच्या तुलनेत फक्त ६० टक्केच खतांची उचल रब्बीमध्ये होईल. खते गोदामांमध्ये पडून असून, अधिक किमतीची खते कुणीच घेत नसल्याची माहिती मिळाली.

खानदेशात सुमारे चार लाख हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, अशी अपेक्षा होती. परंतु तापी, पांझरा, गिरणा व गोमाई व सुसरी नदीचा काठ वगळता इतर भागात रब्बी हंगामाची स्थिती जेमतेम आहे. निम्मेच लक्ष्यांक साध्य होत आहे. परंतु रब्बीसंबंधी कृषी विभागाने तयारी करताना खतांची मागणी मागील वर्षाएवढीच केली होती. त्यानुसार मंजुरी मिळाली.

खानदेशात सुमारे दोन लाख ७० हजार मेट्रिक टन खतांची उचल खरिपात होईल, अशी अपेक्षा होती. परंतु यापैकी एक ते सव्वा लाख मेट्रिक टन खतांचीच उलच होईल, असे चित्र आहे. त्यातच डीएपी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्याची उचल नाही. रावेर, यावल, चोपडा, शहादा व तळोदा भागात पोटॅशची केळी व पपई बागांसाठी तेवढी मागणी आहे. कांदा व मका लागवडीसंबंधी युरिया आणि फॉस्फेटची मागणी आहे. सरळ खतांची मागणी बरी आहे. परंतु संयुक्त खते महाग असल्याने त्यांना फारसा उठावच नाही.

युरिया, फॉस्फेटचा पुरवठा सुरळीत आहे. मध्यंतरी पोटॅशचा पुरवठा विस्कळित झाला होता. तोदेखील आता सुरळीत असून, सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. संयुक्त खतांचा पुरवठा खत कंपन्यांनी सुरळीत केला आहे. त्यात दोन कंपन्यांकडून डीएपीचा पुरवठा निर्देशित लक्ष्यांकापेक्षा अधिक झाला आहे. त्यातच मागणी नसल्याने ती गोदामांमध्ये साठविली जात आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेतील सूत्रांकडून मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT