monsoon
monsoon  
मुख्य बातम्या

मॉन्सूनला पोषक वातावरण 

टीम अॅग्रोवन

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास करत आहेत. उत्तर भारत मॉन्सून व्यापत असून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे. सोमवारी (ता.१४) मॉन्सूनने फारशी प्रगती केलेली नव्हती. मात्र, आज आणखी काही भागांत दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

अंदमान बेटावर नैऋत्य मोसमी वारे २१ मे रोजी दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोरदार मुसंडी मारत वेगाने पुढे सरकला होता. त्यानंतर काही प्रमाणात प्रवास मंदावला होता. एक जून रोजी मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्यास सुरूवात झाल्यानंतर ३ जून रोजी केरळात दाखल झाला होता. त्यानंतर टप्याटप्याने कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तरेकडे चाल केली होती. रविवारी (ता. १३) मॉन्सूनने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या अनेक  भागात दाखल झाला. आजही (ता.१५) आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. 

मॉन्सूनने गेल्या काही दिवसांत चांगलीच प्रगती केल्याने उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली आहे. गेल्या २६ दिवसांत मॉन्सूनने जम्मू काश्मीरपर्यंत मजल मारली आहे. यंदा हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनने दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरपर्यंत मजल मारली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT