Farmers will survive only if they are guaranteed: Pasha Patel
Farmers will survive only if they are guaranteed: Pasha Patel  
मुख्य बातम्या

हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगेल ः पाशा पटेल

टीम अॅग्रोवन

सगरोळी, जि. नांदेड : ‘‘निसर्गाच्या लहरीपणामुळे कुठल्याही पिकाचे खात्रीलायक उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. शेती मालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल,’’ असे प्रतिपादन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘कृषीवेद २०२०’ या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये मंगळवारी (ता.११) ते बोलत होते. संस्कृती संवर्धन मंडळाचे विश्वस्त भालचंद्र देगलूरकर, अध्यक्ष प्रमोद देशमुख, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे, व्ही. एन. आरचे वरिष्ठ विक्री अधिकारी अनुप नागर, कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी विनोद पाटील, उद्धवराव खेडेकर, अनिल पाटील, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश पाटील, राष्ट्रीय बांबू अभियानाचे मराठवाडा समन्वयक भालेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

पटेल म्हणाले, ‘‘शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत आहेत. येत्या काळात सोयाबीन, हरभऱ्याच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

SCROLL FOR NEXT