farmers
farmers  
मुख्य बातम्या

केळी उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा अडत्यांवर बहिष्कार : परिषदेत ठराव

टीम अॅग्रोवन

गिरगाव, जि. हिंगोली : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारे कपात करुन देयके अदा केली जात आहेत. केळी उत्पादकांची आर्थिक लूट तत्काळ थांबावी, अन्यथा अडत्यांवर सामुहिक बहिष्कार टाकला जाईल. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चळवळ उभारावी असा ठराव गिरगाव (ता.वसमत) येथे रविवारी (ता.२२) आयोजित केळी परिषदेत मंजूर करण्यात आला. यावेळी खंडोजी माळवटकर अध्यक्षस्थानी होते. शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, हनुमंत राजेगोरे, रावसाहेब अडकिणे, बेगडराव गावंडे, डॉ. किरण देशमुख, विजय नरवाडे, बालाजी यशवंते, पराग अडकीने, दिलीप इंगोले, संभाजी बेले, प्रभाकर मोरे, शंकरराव कऱ्हाळे, विलास रायवाडे, विलास नादरे, देविदास पाटील, रवींद्र नादरे, अशोक कऱ्हाळे, अरुण नादरे, गाधर नादरे, माधव मालेवार, मारोती केंचे, शिवप्रसाद रायवाडे, नामदेव साखरे आदी उपस्थित होते. केळीला जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यात जास्त भाव मिळत आहेत. परंतु हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मात्र पत्ती, दंडा कपात करत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पक्के रस्ते नसल्याने शेतातून  वाहनांपर्यंत केळीचे घड घेऊन येण्यासाठी प्रतिक्विंटल २० ते २५ रुपये खर्च येत आहे. खरेदीदार व आडत्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून अकारण, अवाजवी आकारणी बंद करावी. केळीची गट शेती करावी, भाव सार्वजनिक करून तो निश्चित करावा, क्रेटचे वजन करावे, दंडा वजन करावे, पत्ती लावू नये, ५०० ग्रॅमच्या वर वजन गृहीत धरावा. व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या केळी बागेतील सर्व झाडे न्यावीत आदी मुद्द्यांवर उपस्थित शेतकऱ्यांचे एकमत झाले. परिषेदेत हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव, डोंगरकडा, कुरुंदा, पारडी, दाभडी, वडगाव, रेडगाव, दिग्रस, नांदेड जिल्ह्यातील बारड, मालेगाव, धामदरी, अर्धापूर येथील शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT