hapus
hapus  
मुख्य बातम्या

‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणार

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले तरी शेतकऱ्यांकडे या पिकाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून पुरावा नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील १३ संस्थांच्या नावे भौगोलिक निर्देशांक प्रमाणपत्र मिळवण्यात कृषी विभागाला यश आले आहे. त्यासाठी गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. फलोत्पादन विभागाने यात महत्वाची भूमिका बजावली आहे. भौगोलिक निर्देशांक अर्थात जीआय (जिओग्रोफिकल इंडिकेशन) मिळालेल्या पिकांना देशी व विदेशी बाजारात लाभ होत असल्याचा दावा केला जातो. मात्र, अशा पिकांना ‘जीआय’ मिळून देखील त्याचे लाभ कार्यक्षेत्रात दिसून येत नाहीत. कारण ‘अधिकृत वापरकर्त्या’ शेतकऱ्यांचीच वानवा आहे. चिन्हांकनाचा फायदा शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मिळण्यासाठी यापूर्वी मोहिम राबविली गेली नव्हती. ‘‘निर्देशांक मिळालेल्या पिकाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना या पिकाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून एक प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मुख्य मुद्दा दुर्लक्षित राहिला. त्यामुळे चिन्हांकन मिळून देखील स्थानिक बाजारात किंवा निर्यातीमध्ये शेतकरी ‘जीआय’च्या नावाखाली आपल्या पिकाचे ब्रॅंडिंग करण्यात पिछाडीवर राहिले आहेत,’’ अशी माहिती एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली.   कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागाने ही उणीव दूर करण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांना ‘वापरकर्ता प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मोहिमेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांकडून अर्ज गोळा करून चेन्नईच्या भौगोलिक निर्देशांक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध होतील. ‘‘शेतकऱ्यांना केवळ दहा रुपयात वापरकर्ता होण्याची सुविधा केंद्रीय कृषी मंत्रालयाने उपलब्ध करून दिली आहे.’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भौगोलिक चिन्हांकन मिळालेले पीक व  संस्थेचे नाव

  • लासलगाव कांदाः बळीराजा शेतकरी गट, नाशिक
  • जळगाव भरीत वांगीः निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदुळवाडी, जळगाव
  • सासवड अंजीरः महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघ, पुणे
  • सोलापूर डाळिंबः महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघ, पुणे
  • सांगली बेदाणाः महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, सांगली
  • सांगली हळदः सांगली हळद क्लस्टर, सांगली
  • जालना मोसंबीः जालना जिल्हा मोसंबी उत्पादक संघ, जालना
  • बीड सीताफळः बालाघाट सीताफळ संघ, बीड
  • वेंगुर्ला काजूः कोकण काजू समुह, सिंधुदुर्ग
  • घोलवड चिक्कूः महाराष्ट्र काजू उत्पादक संघ,डहाणू
  • मराठवाडा केसरः आंबा उत्पादक संघ, औरंगाबाद
  • कोकण हापूसः केळशी परिसर संस्था, रत्नागिरी
  • प्रतिक्रिया भौगोलिक संकेत चिन्हांकनाचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी फलोत्पादन विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी संबंधित संस्थांसोबत मोहिम उघडावी, तसेच पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांशीही समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आहेत.  — कैलास मोते, कृषी संचालक (फलोत्पादन व मृदसंधारण विभाग)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT