आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना  चिलगव्हाणमध्ये श्रद्धांजली To the farmers who committed suicide Tribute to Chilgavan
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना  चिलगव्हाणमध्ये श्रद्धांजली To the farmers who committed suicide Tribute to Chilgavan 
मुख्य बातम्या

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना  चिलगव्हाणमध्ये श्रद्धांजली 

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : देशातील पहिली शेतकरी आत्महत्या, अशी नोंद झालेल्या साहेबराव करपे कुटुंबीयांच्या ३५व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्रांनी चिलगव्हाण येथे दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्यांना मशाल पेटवून श्रद्धांजली अर्पण केली.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व शेतकरीविरोधी कायद्यांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी एका नव्या संस्थेची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने चिलगव्हाण येथे उपोषणाच्या समारोप कार्यक्रमात या संदर्भात घोषणा करण्यात आली. 

या संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहेबराव करपे कुटुंबीयांचे चिलगव्हाण येथे स्मारक उभे राहावे यासाठी किसानपुत्र आंदोलन सर्व शक्तीनिशी सहकार्य करेल, असाही निर्णय झाला. शेतकरी

आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या बद्दल किसानपुत्र आंदोलनाने चिंता व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे सांगून शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोपही करण्यात आला.  अशी निघाली पदयात्रा  औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी १२५ किलोमीटरची पदयात्रा करण्याचा निर्धार डॉ राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला होता. त्यानुसार ‘शेतकरी संवेदना यात्रा’ ११ मार्च रोजी औंढा नागनाथ येथून निघाली व १९ मार्च रोजी चिलगव्हाण येथे पोहचली. नऊ दिवसांच्या या पदयात्रेत अनेक गावांना भेटी दिल्या. औंढा नागनाथला सुरुवात करून येहळेगाव करीत दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, या मार्गाने ही पदयात्रा १९ मार्च रोजी चिलगव्हाणला पोहचली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT