loan waiver scheme
loan waiver scheme  
मुख्य बातम्या

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे अनुदान एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग वर्ग होणार होते. परंतु अद्याप अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. राज्य शासनाने सप्टेंबर २०१९ अखेरची दोन लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिल २०२० पर्यंत अनुदान देण्याचे करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते.  जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ३०३ कोटींची कर्जमाफी मिळाली, तर दोन लाखांवरील थकबाकीदार यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली. त्यातून दोन हजार शेतकऱ्यांना सव्वीस कोटी १४ लाखांचा लाभ मिळाला. यामुळे सुमारे पावणेदोन लाख शेतकरी कर्जमुक्त झाले, पण नियमित परतफेड करणारे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहिले. जानेवारीपासून कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी झाली परंतु अद्याप ही नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र योजनेचा लाभ मिळाला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT