Farmers waiting for farm pond work in Nagar district
Farmers waiting for farm pond work in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर शेती, फळबागा जगवता आल्याचा गेल्या दहा वर्षांचा अनुभव पाहून गेल्या पाच वर्षांत नगर जिल्ह्यात तब्बल ५६ हजार शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून शेततळे करण्यासाठी अनुदान मागणी केली. मात्र, कोरोना संकटामुळे या योजनेतून नवीन कामे सुरू करणे गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. मागणी केलेल्या पैकी आत्तापर्यंत पाच वर्षांत सतरा हजार शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. कृषी विभागाने पात्र ठरवलेल्या सुमारे तीस हजार शेतकऱ्यांना शेततळ्याची कामे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान यंदा कोरोना संकटामुळे मागणीच्या ३३ टक्केच निधी मिळणार असल्याने नवीन कामे सुरू करू नये या बाबत वरिष्ठांचे आदेश असल्याने अजून काही महिने तरी शेतकऱ्यांना शेततळ्याची कामे पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात पीक जगवण्याचा प्रयोग शेततळ्याच्या माध्यमातून सुरू झाला. नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत तब्बल पाच ते सहा वेळा दुष्काळी परस्थितीला सामोरे जावे लागले. मात्र, अशा दुष्काळी परिस्थिती शेततळ्याने अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा वाचल्या.

अनेक शेतकरी शेततळ्याच्या पाण्यावर भाजीपाला पिके घेण्यातही यशस्वी झाले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत शेततळ्याचा लाभ मिळण्यासाठी तब्बल ५६ हजार १३४ शेतकऱ्यांनी अनुदान मिळावे म्हणून कृषी विभागाकडे मागणी केली. त्यातील आत्तापर्यंत सतरा हजार शेततळ्याची कामे पूर्ण झाली. आत्तापर्यंत शेततळ्यावर ६८ कोटी १२ लाखांचा खर्च झालेला आहे. अजूनही तीन हजार शेततळ्याचे अनुदान देणे बाकी आहे.

नगर जिल्ह्यातील पाच वर्षाची स्थिती
लक्ष्यांक ९२००
मागणी ५६ हजार १३४
सेवा शुल्क भरलेले पात्र ४६ हजार ११५
जागा योग्य लाभार्थी ३९९६१
मंजुरी दिलेले ३४७३१
कार्यारंभ आदेश २४५५७
पूर्ण कामे १६९३२
अनुदान वितरण १३८७६
खर्च ६८ कोटी १२ लाख

शेततळे कमी पाण्यात शेती करण्यासाठी आणि संकटाच्या काळात महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागणी करणारे शेतकरी अनेक आहेत. शासनाने किमान शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधी कमी करू नये आणि नवीन कामे सुरू करावीत. - बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT