विदर्भातील शेतकऱ्यांनी जागतिकस्तरावरील  बदलांचा स्वीकार करावा : गडकरी  Farmers in Vidarbha are world class Changes should be accepted: Gadkari
विदर्भातील शेतकऱ्यांनी जागतिकस्तरावरील  बदलांचा स्वीकार करावा : गडकरी  Farmers in Vidarbha are world class Changes should be accepted: Gadkari 
मुख्य बातम्या

विदर्भातील शेतकऱ्यांनी जागतिकस्तरावरील  बदलांचा स्वीकार करावा : गडकरी 

टीम अॅग्रोवन

नागपूर : विदर्भातील बेरोजगारी, उपासमार, शेतकरी आत्महत्या, या समस्यांचे समाधान हे शेतीमालाला भाव तसेच शेतीपूरक प्रक्रिया उद्योगांना चालना या अशा पर्यायातूनच शक्‍य आहे. मात्र हे साध्य साधायचे असल्यास त्याकरिता शेतकऱ्यांना देखील परिवर्तनशील होत जागतिकस्तरावरील बदलांचा स्वीकार करण्याची गरज आहे. त्यामध्ये शेतीमालाचा दर्जा सुधारणे अग्रस्थानी असून, त्यानंतरच्या टप्प्यात प्रक्रिया आणि निर्यातीला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.   कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), ॲग्रोव्हीन फाउंडेशन यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित विदर्भातील कृषिमाल भाजीपाला निर्यात क्षमता या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता.९) हॉटेल सेंटर पॉइंट येथे पार पाडली. या वेळी ते बोलत होते. अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. अंगामुथू, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्‍त रवींद्र ठाकरे, डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्रा, गोविंद हांडे, महाराष्ट्र पणन मंडळाचे उपमहाव्यवस्थापक अजय कडू यांची या वेळी उपस्थिती होती.  गडकरी म्हणाले, ‘‘विदर्भातून शेतमाल निर्यातीला चालना मिळावी यासाठी पूरक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना शेतकरी कंपन्या व इतरांची जोड मिळणे अपेक्षीत आहे. या भागातील संत्रा देशाच्या इतर भागात स्वस्त दरात पोहोचावा याकरिता ऑरेंज रेल सुरू केली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या सिंदी (वर्धा) येथील ड्रायपोर्टमधून सुद्धा वातानुकूलीत फूड कंटेनरमधून थेट बांग्लादेशला संत्रा निर्यात केली जाणार आहे. हा प्रकल्प जेएनपीटीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर करण्याचे प्रस्तावीत असून, ही प्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडेल. त्यानंतर या प्रकल्पाचे काम अधिक गतिमान होणार आहे. निर्यात सुविधावाढीकरिता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५५ एकर जागेवर १५० कोटी रुपयांतून ॲग्रो कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नातून विदर्भातून ५०० कोटीं रुपयांच्या शेतीमालाची निर्यात आणि दूध संकलन २५ लाख लिटर असे उद्देश साधण्यात येणार असून, विदर्भाला शेतीमाल निर्यातीचे हब केले जाईल. अपेडाने देखील सकारात्मकता दर्शवीत या भागासाठी नागपूर येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे.’’  विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जे. के. ॲग्रो इंडस्ट्रीजचे जावेद खान, राहूल ठाकरे, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार, अमोल तोटे, विद्या मानकर, हिंदूराव चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती.  -  अपेडा आखणार ॲक्‍शन प्लॅन  नागपूरनंतर येत्या दोन-तीन महिन्यांनी अमरावती येथे निर्यात कार्यशाळा अपेडाच्या वतीने आयोजीत करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात जिल्हास्तरावर अशा कार्यशाळांचे आयोजन होत शेतकऱ्यांमध्ये शेतीमाल निर्यातीसाठी जागृती निर्माण केली जाईल, अशी माहिती अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. अंगामुथू यांनी या वेळी बोलताना दिली. विदर्भासाठी अपेडाचा स्वतंत्र ॲक्‍शन प्लॅन असेल. त्या अंतर्गत मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेच्या तज्ज्ञांना मार्गदर्शनाकरिता पाचारण केले जाईल. नजीकच्या काळात फळांऐवजी ज्यूस किंवा तत्सम प्रक्रियाजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठ्याचे धोरण विदर्भातील निर्यातदारांनी अंगीकारावे, असे आवाहन अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. अंगामुथू यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT