Farmers' unions march in the Nagar district
Farmers' unions march in the Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात शेतकरी संघटनांचा मोर्चा

टीम अॅग्रोवन

नगर ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. ८) नगर जिल्ह्यामधील राहुरी, अकोले, पाथर्डी यासह अन्य भागात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. अकोल्यात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डाॅ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राहुरी, पाथर्डीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

सरकारने शेतकऱ्यांना लुटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी शेतीमालाला दीडपट भावाची हमी मिळेल, अशी धोरणे स्वीकारा, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल अशी पीकविमा योजना सुरू करा, कसत असलेल्या जमिनीचे हक्क कसणारांच्या नावे करा. शेतीच्या सर्वंकष, शाश्वत व गतिमान विकासासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या प्रकाशात पर्यायी शेती धोरणाची आखणी करा, या सर्व प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, चंद्रकांत नेहे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, सिटू, किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाथर्डीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कचरे, शरद मरकड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रामकिसन सिरसाठ, अरुण मतकर, किरण अकोलकर, बाळासाहेब गर्जे, दिनेश सरगड यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. राहुरी येथे सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT