‘ट्रॅक्टर परेड’चीच  राजधानीत चर्चा
‘ट्रॅक्टर परेड’चीच राजधानीत चर्चा 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’चीच राजधानीत चर्चा

वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनातील ५९व्या दिवशीही शेतकऱ्यांचा उत्साह कायम होता. सरकारने बोलणी थांबविली असली, तरी ‘जोपर्यंत कायदे वापसी नाही, तोपर्यंत घर वापसी नाही’ असे आंदोलकांनी स्पष्ट केले.  दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड संदर्भातील नियोजनावर संपूर्ण दिवसभर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाना पोलिसांबरोबर मार्गनिश्‍चितीबाबतच्या बैठका दिवसभर सुरू होत्या. शेतकऱ्यांच्या २६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर परेडबाबत पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तरांचलमध्ये नियोजन सुरू असून, काही भागातील ट्रॅक्टर दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या परेडसाठी दिल्लीतील रिंगरोडची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवरून केंद्र सरकारमधील मंत्री आणि अनेकांनी वाद निर्माण केल्यानंतर शेतकऱ्यांनी भारतीय तिरंगा लावून दिल्लीत प्रजासत्ताकदिनी परेड करण्याची घोषणा केली होती. या परेडमध्ये शेतकरी काही देखावेही सादर करण्याची शक्यता आहे, याकरिता ट्रॉलीच्या रचनेत काहींनी बदलही केले आहेत. संशयिताला पकडले... शुक्रवारी रात्री (ता.२२) शेतकऱ्यांनी एका संशयिताला पकडून माध्यमांसमोर हजर केले होते. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान घातपात घडविण्याच्या उद्देशाने तो आला होता. त्याला सिंघू आंदोलनस्थळी रात्रीच्या गस्तीवरील शेतकऱ्यांच्या पथकाने पकडले. चौकशी केल्यानंतर त्याने १० जणांच्या गटाला घातपात घडविण्यासाठी पाठविल्याचे व चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्यासाठी पाठविल्याचे माध्यमांसमोर सांगितले. यानंतर त्यास हरियाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, यानंतर पोलिसांनी त्याच्या जबाबाचा व्हिडिओ माध्यमांना पाठविला. त्यात त्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT