Farmers struggle to save vineyards in Sangli district
Farmers struggle to save vineyards in Sangli district 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड

टीम अॅग्रोवन

सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे अगोदरच द्राक्ष उत्पादक संकटात सापडला होता. त्यातच कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदा पुढील हंगामाच्या तयारीला लागला. तोच गेल्या पंधरा दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा दणका बसला. त्यामुळे द्राक्ष बागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 

सध्या निर्यातीपेक्षा शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात बागा वाचवू मग द्राक्ष निर्यातीचा विचार करु, अशी भूमिका शेतकऱ्यांनी केली आहे. परंतू, द्राक्षाचे उत्पादन आणि दर्जा  टिकवण्यासाठी जिद्दीने लढा सुरु आहे. गेल्यावर्षी महापूर, अतिवष्टी या साऱ्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातूनही मोठ्या जिद्दीने द्राक्ष बागा वाचविल्या होत्या. परंतु, बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाच्या उत्पादनाला फटका बसला. दर्जाही घसरला. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतले.

द्राक्षाला दरही अपेक्षित मिळू लागला. मात्र, ऐन हंगामात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बाजारपेठा बंद झाल्या. त्यातही शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली.  कोरोना आणि अतिपावसाने फळ छाटणी उशीरा सुरु झाली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला.

अगोदरच हंगामाला उशीरा प्रारंभ झाला. त्यात अतिवृष्टी सुरु झाली. त्यामुळे पोंगा, फुलोरा अवस्थेत असलेल्या बागांना जोरदार फटका बसला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT