Farmers starve due to urea shortage in Khandesh
Farmers starve due to urea shortage in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात पाऊसमान कमी आहे. काही भागात पाऊस आहे. शेतकरी खते देत आहेत, पण युरियाची टंचाई पुन्हा एकदा तयार झाली आहे. ही टंचाई कृत्रीम असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. प्रशासनाचा कुठलाही धाक नसल्याची टीका देखील शेतकरी करीत आहेत. 

युरियाचा पुरवठा चांगला आहे. जळगाव जिल्ह्यात ११ हजार टन खतांचा संरक्षित साठा आहे, असा दावा सुरवातीला कृषी विभाग करीत होता. सोयाबीन बियाण्याची टंचाई, एचटीबीटी कापूस बियाण्याचा काळाबाजार आणि आता युरियाची टंचाई आणि जादा दरात विक्री, अशा संकटांना शेतकरी सतत तोंड देत आहेत. कृषी विभागाची तपासणी पथके, यंत्रणा ग्रामीण भागात पोचत नाही. अनेक विक्रेत्यांशी अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत, असा संतापही शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

पाऊस आला आणि युरिया टंचाई कशी तयार झाली, असा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख टन युरियाचा पुरवठा सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध होईल. जुलै महिना जवळपास संपला आहे. किमान ६० हजार टन युरियाचा पुरवठा जुलैअखेर अपेक्षित होता. परंतु एवढा पुरवठाच झालेला नाही. जुलैमधील मंजूर लक्षांकाच्या तुलनेत खानदेशात फक्त ५० टक्के युरियाचा पुरवठा झाला आहे.

१२ जुलैनंतर अनेक भागात पेरणी झाली. या पिकांसाठी शेतकरी सरळ खतांची मागणी करीत आहेत. त्यात युरिया, दाणेदार सुपर फॉस्फेटसाठी शेतकरी खत विक्रेत्यांकडे जात आहेत. पण खत विक्रेते पुरेशी खते देत नाही. युरियाची गोणीमागे ३० ते ५० रुपये जादा दरात ग्रामीण भागात विक्री सुरू आहे. 

तक्रारी अनेक; कारवाई शून्य

जळगावमध्ये पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, भुसावळ, धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागात खतांबाबत शेतकऱ्यांमध्ये तक्रारी आहेत. तक्रारी अनेक आणि कारवाई शून्य, असा प्रकार आहे. कृषी विभाग किरकोळ तपासणी करून मोकळा होत आहे. टंचाई नाही. शेतकरी लेखी तक्रार करू शकतात, टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा, अशी बतावणी कृषी विभाग करून नामनिराळा होत आहे. कारवाई मात्र का केली जात नाही, किती जणांना नोटिसा दिल्या. साठा तपासणीत कुठे काय दिसले, याचे अहवाल जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT