गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ 
मुख्य बातम्या

गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

टीम अॅग्रोवन
चोपडा, जि. जळगाव (प्रतिनिधी) : परिसरात गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे उत्पादन निम्म्यावर आले. या वर्षीही शेतकऱ्यांनी बोंड अळी रोखण्याऱ्या विविध पर्यायांचा वापर सुरू केला आहे. फेरोमोन ट्रॅप्स व लुर्सची मागणी पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने वाढली अाहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार निंबोळी अर्काची कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात येत असून, बोंड अळीला रोखण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
चोपडा परिसरात या वर्षी सुमारे ६ लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचा अंदाज आहे. त्यात मॉन्सूनपूर्व व कोरड क्षेत्रातील संकरित बीटी व देशी वाणांची लागवड आहे. बऱ्याच भागात पीक ६० ते ६५ दिवसांचे झाले आहे. हमीभावात २५ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने कापसाचे भावही तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली आहे.
कामगंध सापळे वापरण्याचे प्रमाण या वर्षी वाढले आहे. फेरोमोन ट्रॅप्स, लुर्स, चिकट सापळे, अशा प्रकारांसह अांतरपिकातील मका, चवळी, बाजरी, उडीद, राळाची पेरणी, असे असंख्य प्रयोग शेतकऱ्यांनी केले आहेत. किडींच्या प्रजनन काळात फवारणीसारखे नियंत्रणाचे उपाय करण्याची सूचना कृषी विभाग देत आहे. त्यासाठी अधिकारी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT