कीटकनाशक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचा मजकूर असलेला स्टॅम्पच कृषीविक्रेत्यांनी तयार केला आहे
कीटकनाशक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचा मजकूर असलेला स्टॅम्पच कृषीविक्रेत्यांनी तयार केला आहे 
मुख्य बातम्या

कीडनाशक खरेदी करताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांवर जबाबदारी

Vinod Ingole

यवतमाळ ः फवारणीदरम्यान विषबाधेने जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणात कृषी सेवा केंद्र संचालकांवरदेखील गुन्हे दाखल झाले. त्यानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांनी सावध पावित्रा घेत ‘कीटकनाशक खरेदीनंतरची जबाबदारी माझी’ अशा मजकुरावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.  यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. या किडीचे नियंत्रणासाठी शिफारसीत नसलेल्या कीडनाशकाचा बेबंद वापर शेतकऱ्यांकडून करण्यात आला. शिफारस नसताना अनेक कीडनाशक एकत्रित करून त्यांचीही फवारणी केली गेली. यातून जिल्ह्यात ७००  पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. २२ शेतकरी, शेतमजुरांना या घटनेत जीव गमवावे लागले. विषबाधेच्या या घटनांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी यवतमाळकडे धाव घेतली.  प्राथमिक चौकशीत कृषी सेवा केंद्र संचालकांकडूनच शेतकऱ्यांना ही कीडनाशके दिल्या गेल्याचे समोर आले. त्यामुळे काही कृषी सेवा केंद्र संचालकांची चौकशी तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत घडलेल्या या घडामोडींमुळे कृषिक्षेत्र पुरते हादरून गेले होते. कृषी विकास अधिकारी दत्तात्रय कळसाईत यांचे निलंबनही करण्यात आले.  स्टॅंपवर शेतकऱ्याची सही ‘‘बिलामधील नमूद केलेली कीटकनाशके माझ्या मर्जीने मी घेतलेली आहे. त्यास फवारणीचे वापर करताना घ्यावयाची संपूर्ण दक्षतेबाबत मला माहिती दिलेली असून पुढील जबाबदारी माझी राहील. करिता सही करीत आहे.’’ अशा प्रकारचा मजकूर असलेले स्टॅम्पच पुसद तालुक्‍यात कृषी व्यावसायिकांनी तयार केले आहेत. कोऱ्या कागदावर असा मजकूर असलेला स्टॅम्प लावत त्यावर कीटकनाशक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यात येत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT