Farmers in Nashik district are waiting for Rs 16 crore for maize
Farmers in Nashik district are waiting for Rs 16 crore for maize 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना मक्याच्या १६ कोटींची प्रतीक्षाच

टीम अॅग्रोवन

नाशिक : व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या मक्याला रास्त दर मिळत नाही. त्यामुळे १, ७६० रुपये हमीभावाच्या आशेने जिल्ह्यातील सात हजारांवर शेतकऱ्यांनी शासकीय मक्याची खरेदी केंद्रात विक्री केली. विक्रीनंतर किमान १५ दिवसांनंतर हमीभावप्रमाणे पैसे पदरी पडतील, अशी आशा होती. मात्र अडीच महिने उलटले, तरी शेतकऱ्यांचे मक्याचे १६ कोटी रुपये अडकले आहेत. पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. 

अगोदरच अटीशर्ती असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भांडवल नसल्याने एकीकडे बँका पीककर्ज वेळेवर देत नाहीत. उसनवारी, सावकारी कर्ज घेऊन काहींनी हंगाम उभा केला. त्यातच पेमेंट देण्यात शासकीय यंत्रणेकडून होत असलेली अडचण डोकेदुखी ठरत आहे. केंद्रावर मका खरेदी पूर्ण न झाल्याने तीनदा लक्ष्यांक वाढला. त्यातच नोंदणी करून चार हजारांवर शेतकरी विक्रीविना वंचित राहिले. असे असताना ज्यांनी मका विकली, अशा घटकांना मका विकून आता पैसे कधी मिळतील, याची वाट पाहावी लागत आहेत. 

देयकांची स्थिती 

जुलैअखेर ५,६८१ क्विंटल मका खरेदीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटींचा परतावा मिळाला आहे. मात्र, अद्याप १६ कोटींवर शेतकऱ्यांची देयके प्रलंबित आहेत. ज्वारी खरेदीत पोर्टलवर नोंद झालेल्या ५१० क्विंटल खरेदीची देयके २,५५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे १३ लाख ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही ९१,५६८ क्विंटल मका खरेदीपोटी १६ कोटी ११ लाख ६ हजार ८८० रुपये प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने पोर्टलवर नोंद झालेली मका व ज्वारीच्या एकूण देयकापोटी १६ कोटी ८२ लाख ८४ हजार ५८५ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. 

खरेदीची स्थिती

शेतकरी नोंदणी ७५८४
एकूण मका खरेदी  ९७ हजार २१९क्विंटल

शेतकऱ्यांनी दोन पैशांच्या अपेक्षेने केंद्रावर मका विकला. खरेदी सुरू होऊन दोन महिने होऊन गेले. अनेक शेतकरी आता देयकांच्या प्रतिक्षेत आहेत. पैसे न मिळल्याने अनेकांचे फोन येतात. शासनाने याबाबत लक्ष देऊन तातडीने पैसे खात्यावर जमा करावे. पालकमंत्री, कृषिमंत्र्यांनी लक्ष घालावे. 

- मनोहर  देवरे, अध्यक्ष, सटाणा दक्षिण भाग सहकारी विकास संस्था 

राज्य सरकारच्या संबंधित विभागाच्या सचिवांकडे पाठपुरावा सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी पैसे मिळतील, असे सांगण्यात आले.  पैसे तातडीने मिळावे, अशी मागणी आहे. - डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT