पारोळा ः कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. सतीश पाटील, संजय पवार व इतर पदाधिकारी.
पारोळा ः कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. सतीश पाटील, संजय पवार व इतर पदाधिकारी. 
मुख्य बातम्या

कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

Chandrakant Jadhav

जळगाव :  खानदेशात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे आठपैकी फक्त सहा कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. त्यातही फक्त मुहूर्त म्हणून कापसाची खरेदी झाली. या सहा केंद्रांमध्ये मिळून तीन क्विंटल कापूस खरेदी गुरुवारी (ता.२६) झाली. शेतकऱ्यांनी अपेक्षित दर नसल्याने या केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

पणन महासंघाच्या जळगाव विभागांतर्गत खानदेशात यावल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, अमळनेर, धुळे, मालेगाव, येवला हे आठ केंद्र सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु यातील फक्त सहा केंद्र सुरू होऊ शकली आहेत. त्यात पारोळा, धरणगाव, अमळनेर, धुळे, मालेगाव व येवला येथील केंद्र सुरू झाले आहेत; तर यावल व मुक्ताईनगर येथील केंद्र कापूस जिनिंग व प्रेसिंगचा प्रस्ताव नसल्याने सुरू झाले नाही. या केंद्रांसाठी प्रस्ताव आले, पण ते उशिराने आले असून, त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ कार्यालय घेईल, असे सांगण्यात आले.

धरणगाव येथील कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पणन महासंघाच्या अध्यक्ष उषाताई शिंदे, आमदार स्मिता वाघ, पणन संचालक संजय पवार आदी उपस्थित होते. पारोळा येथील केंद्राच्या शुभारंभाला आमदार डॉ. सतीश पाटील, तर अमळनेर येथील खरेदी केंद्राच्या शुभारंभाला भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कमी दरांमुळे प्रतिसाद नाही खरेदी केंद्रात हवा तेवढा कापूस पहिल्या दिवशी आला नाही. सहा केंद्रांवर मिळून तीन क्विंटल कापूस आला; तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता.२७) कुठलीही आवक झाली नाही. सध्या खानदेशात कापसाचे दर ४४०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलपुढे आहेत. दुसऱ्या बाजूला पणनच्या केंद्रावर कापसाला ४३२०, ४२२० आणि ४१२०  रुपये प्रतिक्विंटल दर ग्रेडनुसार दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातही बोनस द्यावा गुजरात सरकारने जसा कापसाला प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस दिला, तसा बोनस महाराष्ट्र सरकारनेही जाहीर करावा, अशी मागणी पणन संचालक संजय पवार यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT