Farmers exercise while getting the required fertilizers
Farmers exercise while getting the required fertilizers 
मुख्य बातम्या

अकोला : आवश्‍यक खते मिळवताना शेतकऱ्यांची कसरत

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश भागात आता एक महिना लोटला आहे. या काळात अनेक शेतकऱ्यांनी पिकाला पेरणीनंतर खताची दुसरी मात्रा देण्याचे काम हातात घेतले आहे. परंतु शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेल्या कंपन्यांची खते मिळवताना कसरत करावी लागत आहे. गेले तीन दिवस कृषी केंद्र संचालकांनी संप पुकारल्याने सर्व ठप्प पडलेले होते. आता केंद्र सुरू होताच पुन्हा खते व कीडनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामासाठी मिश्रखते, युरियाचा मुबलक साठा असल्याचे अधिकारी वारंवार सांगत होते. तशा प्रकारची आकडेवारीही दिली जात होती. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्थिती वेगळी असल्याचे सध्याच्या खत टंचाईवरून दिसून येत आहे.

बाजारात १०.२६.२६, २०.२०.०.१३, युरिया अशा खतांची सध्या मागणी आहे. विशिष्ट कंपन्यांची ही खते पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते विक्रेतेही सहजपणे ही खते शेतकऱ्यांना देत नाहीत.  विक्रेत्यांनाही ही खते डिलरकडून घेताना सोबत दुसरी खते घेण्याचा आग्रह पूर्ण करावा लागत असल्याचे ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. प्रामुख्याने वितरकांकडून ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात खत पुरवठा केला जात नाही. अकोला जिल्ह्यात मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करीत काही प्रमुख वितरकांना कारणे दाखवा द्यावी लागली. ग्रामीण भागातील विक्रेत्यांपर्यंत खत पुरवठा तातडीने करा, अशा प्रकारचे आदेशच त्यांनी काढले होते. यावरूनही खत वितरणाची परिस्थिती लक्षात येते.

पुरेशा साठ्याचा दावा हंगामासाठी आम्ही आधीच पुरेसे नियोजन केलेले आहे. सध्या प्रत्येक तालुक्यात मिश्र खते, युरियाचा पुरेसा साठा आहे. वरील पातळीवरून खतांचा पुरवठाही सुरू आहे. खतांची टंचाईबाबत, वाढीव दराने विक्री संदर्भात शेतकऱ्यांच्या कुठेही तक्रारी नाहीत. त्यामुळे कुठेही खत टंचाई नाही असे अधिकारी दावा करतात. मुळात अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीचा आधार हा ई-पाॅस मशीनवरील उपलब्ध आकडेवारी असल्याचे स्पष्ट आहे. यावर्षी कोरोनाच्या काळात बहुतांश विक्रेत्यांनी ई-पाॅस मशीनद्वारे खत वितरण केलेले नाही. थेट विक्री करण्यात आली. त्यामुळे या यंत्रणेकडे माहिती अपडेटच झालेली नसल्याचाही प्रकार घडलेला आहे.

सध्या पीक वाढीच्या अवस्थेत युरियाची आवश्यकता आहे. त्यामुळे या खताची मागणी आहे. पिकात हिरवेपणा कमी झाला आहे.  त्यामुळे आम्ही युरियाची मागणी केली तर मिळाले नाही. काही ठिकाणी युरिया घ्यायचा असेल तर सोबत दुसरी खते घेण्याचा आग्रह केला जात आहे. - विशाल भालतिलक, बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला

जिल्ह्यात युरिया वगळता इतर खते मुबलक प्रमाणात आहेत. आम्ही वरिष्ठांकडे युरियाच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. येत्या काळात कपाशी पिकासाठी युरियाची गरज वाढणार आहे. पुढील आठवड्यात युरियाची रॅक लागण्याची शक्यता असल्याने ही अडचण दूर होईल. - डॉ. मुरली इंगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अकोला

ठळक मुद्दे

  • शेतकऱ्यांना हवी असलेली मिश्र खते, युरिया सहज मिळत नाही
  • छोट्या विक्रेत्यांनाही विशिष्ट कंपनीचा युरिया हवा असेल तर दुसरी खते घेण्याचा आग्रह
  • वाढीव दराने विक्री परंतु तक्रारी नाहीत
  • येत्या १५ दिवसांत खतांची मागणी वाढणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT