वैजापूरच्या तहसील कार्यालयात मोफत दूधवाटप
वैजापूरच्या तहसील कार्यालयात मोफत दूधवाटप 
मुख्य बातम्या

वैजापूरच्या तहसील कार्यालयात मोफत दूधवाटप

टीम अॅग्रोवन

वैजापूर, जि. औरंगाबाद : येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता. ७) मोफत दूध वाटून शासनाच्या दूध दर धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.  वैजापूर तालुक्यातील व गोदावरी काठावरील ८० टक्के शेतकरी हे दूध धंद्यावर अवलंबून आहेत. गेल्या अकरा महिन्यांत दूध दरामध्ये सातत्याने घट होत असल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याच पाश्वभूमीवर तालुक्यातील लाखगंगा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मोफत दूधवाटप करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या वेळी या विशेष ग्रामसभेत सततच्या दूध दारामध्ये होणाऱ्या घसरणामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून गावातील व तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध तहसील व जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन मोफत दूधवाटप करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार सोमवारी (ता. ७) वैजापूर तालुका काँग्रेसतर्फे वैजापूर तहसील कार्यालयात मोफत दूधवाटप करून शासनाच्या दूध दरविषयीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.  दूध दरविषयी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. या वेळी तहसील कार्यालयात शंभर लिटर दुधाचे मोफत दूधवाटप करण्यात आले. या मोफत दूधवाटपात काॅंग्रेसचे आ. सुभाष झाबड, शेतकरी नेते धनंजय धोर्डे, कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, लाखगंगा सरपंच दिगबर तुरकणे व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT