शेतकरी उत्पादक कंपनीकडून ई-नाममध्ये ट्रेडिंग 
मुख्य बातम्या

वसमत येथे शेतकरी उत्पादक कंपनीकडून ई-नाममध्ये ट्रेडिंग

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत ट्रेडिंग करणारी सातेफळ (ता. वसमत) येथील सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी ही पहिली शेतकरी कंपनी ठरली आहे. बुधवारी (ता. १६) या शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० क्विंटल हळदीचे आॅनलाइन ट्रेडिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी यापूर्वीच वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत सुरू करून शेतीमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये उतरलेली आहे. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत व्यवहार सुरू झाल्यानंतर सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीने ई-नाम पोर्टलवर नोंदणी करून हळदीची ट्रेडिंग केली आहे. यामुळे कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांच्या क्लीनिंग ग्रेडिंग केलेल्या शेतीमालाची एकत्रिरीत्या ई-आॅक्शन पद्धतीने विक्री करता येत आहे. यामुळे चांगले दर मिळत आहेत. वैयक्तिकरीत्या शेतकऱ्यांना लिलावासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. बुधवारी (ता. १६) सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीने ५०० क्विंटल हळद ई-नाम प्रणालीअंतर्गत विक्री केली, असे कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड यांनी सांगितले. वसमत बाजार समितीअंतर्गत ई-नामअंतर्गत व्यवहार सुरू झाले आहेत. आॅनलाइन वेइंग पद्धतीमुळे शेतीमालाच्या वजनाची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर होत आहे. ई-नामबाबत शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये जागृती केल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे बाजार समितीचे सचिव एस. एन. शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT