किसान सन्मान योजनेच्या लाभापासून चाळीसगाव तालुक्‍यातील शेतकरी वंचित
किसान सन्मान योजनेच्या लाभापासून चाळीसगाव तालुक्‍यातील शेतकरी वंचित 
मुख्य बातम्या

चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन

चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिल्या टप्प्यात चाळीसगाव तालुक्‍यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईचा लाभ मिळालेला नाही. तालुक्‍यातील एकूण ७५ हजार शेतकऱ्यांपैकी ४५ हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळालेला आहे. इतर शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासंबंधी अनेक तांत्रिक अडचणींसह प्रशासनाच्या चालढकल, मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे.  खातेधारक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये देण्यासंबंधी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबविण्यात येत आहे. ही योजना महत्त्वाकांक्षी ठरली आहे. मात्र, आधार कार्ड पडताळणी, बॅंकेचा तपशील आदी माहिती चुकीची भरल्याने अनेकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुक्‍यातील तब्बल ११ हजार खातेधारकांचे नावेच जुळालेली नाहीत. आधार कार्डवर वेगळे आणि सातबारा उताऱ्यावर नाव वेगळे असल्याने अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेले नाहीत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT