ऐन दिवाळी सणाच्या कालवाधीतही शेतीकामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत
ऐन दिवाळी सणाच्या कालवाधीतही शेतीकामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत 
मुख्य बातम्या

संकटावर मात करीत शेतकरी साजरी करताहेत दिवाळी

टीम अॅग्रोवन

नगर  ः अलीकडच्या काळात शेती संकटाने व्यापलीय, कधी जास्त पावसाने तर कधी पाऊस नसल्याने नुकसान होतेय. मात्र, दिवाळी सण आनंद साजरा करण्याचा सण आहे. त्यामुळे संकटावर मात करून दिवाळी साजरा करतोय, अशी भावना ग्रामीण भागात शेतकरी व्यक्त करीत आहेत. आज (रविवारी) दिवाळी असली तरी शेतीकामे आणि घरात लेकराबाळांसाठी गोडधोड करण्याचीही लगबग पहायला मिळत आहे. 

दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो. वर्षभरातील आनंद व्यक्त करताना मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांमध्येच उत्साह पाहयला मिळतो. ग्रामीण भागात शेती आणि शेतकरी यांच्या स्थितीवरच दिवाळीतील उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीकडेच सगळ्यांचे लक्ष असते. प्रशासनाच्या लेखी चांगला पाऊस झाल्याची नोंद असली तरी यंदा खरिपात कमी जास्ती पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे कापूस, मका, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फूल उत्पादक शेतकरीही पावसाने संकटात आला आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.

दरवर्षी दिवाळीच्या काळात कापसाची विक्री सुरू होत असते. यंदा मात्र फुटलेला कापूस वेचता आला नाही. त्यामुळे विक्री तर सोडाच पण जागेवर कापसाचे नुकसान झाले आहे. शेती संकटाने व्यापली आहे तरी दिवाळी सण आनंद साजरा करणार आहे. त्यामुळे संकटावर मात करून दिवाळी साजरा करतोय, अशी भावना पद्माकर कोरडे या शेतकऱ्याने व्यक्त केली. ग्रामीण भागात बाजारात फटाके, आकाश कंदील, किराणा, कपडे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळत आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT