फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी पकडले
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी पकडले 
मुख्य बातम्या

फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी पकडले

टीम अॅग्रोवन

नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांची फसवणूक झाली आहे. बाहेरील व्यापाऱ्यांना बोलवून स्थानिकांचे सौदे करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी द्राक्षमाल घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपळगाव येथील प्रवीण जाधव या ट्रान्सपोर्ट चालकाच्या ओळखीने सिकंदर नावाच्या व्यापाऱ्याने परिसरात द्राक्षाचे सौदे केले. अनेक द्राक्ष उत्पादकांनी त्यांना माल दिला. मात्र सर्वांना थोडेफार पैसे व खोटे धनादेश देऊन हा व्यापारी पळून गेला. अखेर त्याला पकडण्यात शेतकऱ्यांना यश आले.  शेलू येथील द्राक्ष उत्पादक शंकर जाधव यांनी या व्यापाऱ्याला द्राक्ष विकली. ३ लाख रुपयांचा माल विकल्यानंतर यापोटी त्यांना ५० हजार रोख मिळाले अन् उर्वरित रक्कम म्हणून ५० हजारांचा धनादेश दिला. प्रवीण जाधव यांच्या नावे दिलेला धनादेश ८-९ वर्षे जुना असल्याने बँकेत वटला नाही. याबाबत शंकर जाधव हे अनेकदा वडनेर भैरव पोलिस ठाण्यात जाऊनही अधिकारी तक्रार घेत नसल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांचाकडे धाव घेतली. डॉ. सिंग यांनी लक्ष घातल्यावर वडनेर भैरव पोलिस स्टेशनने कारवाईस सुरुवात केली. समाधानकारक कारवाई न झाल्याने पुन्हा शंकर जाधव यांनी पोलिसांविरोधात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांत व तहसीलदार यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले होते. तरीही गुन्हा दाखल झाला नसल्याने जाधव यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र सर्व पाठपुरावा करून तो फोल ठरला. फरारी व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडवून खुलताबाद येथे पळाला होता. जवळपास पन्नासहून अधिक शेतकऱ्यांची सिकंदर या व्यापाऱ्याने फसवणूक केली आहे. पोलिस यंत्रणा लक्ष देत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फरारी व्यापाऱ्यास पकडण्यासाठी पाळत ठेवली होती. अखेर स्वतःचा जीव धोक्यात घालून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला पकडले असून त्यास वडनेर भैरव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ट्रान्सपोर्ट मालक प्रवीण भाऊसाहेब जाधव यांना अटक करून चांदवड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT