शेतकऱ्यांची २६ मार्चला ‘भारत बंद’ची हाक; आंदोलनाला होणार चार महिने
शेतकऱ्यांची २६ मार्चला ‘भारत बंद’ची हाक; आंदोलनाला होणार चार महिने 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांची २६ मार्चला ‘भारत बंद’ची हाक; आंदोलनाला होणार चार महिने

वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमांवर तीन कृषी कायद्यांविरोधात १० ६ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. १२ चर्चांच्या फेऱ्यांनंतर केंद्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात असल्याने या विरोधात २६ मार्चला ‘भारत बंद’चे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. याच दिवशी आंदोलनास चार महिने होत आहेत. 

शेतकरी आंदोलनांतर्गत संयुक्त किसान मोर्चाने मार्च महिन्यातील आपले उपक्रम आणि आंदोलनाची घोषणा बुधवारी (ता.१०) केली. यात भारत बंदसह महागाई विरोध, बाजार समित्यांत आंदोलन, शहीद भगतसिंग स्मृती दिन आदींचा समावेश आहे. याशिवाय विविध राज्यांत शेतकरी जागृती यात्रा, किसान महापंचायत, किसान क्रांती दिन आदींचे आयोजन केले आहे. याशिवाय कोलकातामध्ये ‘भाजपला मतदान करू नका’ या मुख्य प्रचार रॅलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले. यात दहा हजार विद्यार्थी, शेतकरी, युवक, कामगार आणि नागरिक सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. 

मार्च महिन्यातील आंदोलने... 

  • १५ मार्च : सरकार आणि कॉपोरेट विरोधी दिन, इंधन -गॅस, इतर जीवनावश्‍यक वस्तूंचे वाढत्या दराविरोधात कामगार संघटनांबरोबर रेल्वे स्थानकांवर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे. 
  • १७ मार्च : २६ मार्चच्या भारत बंदच्या नियोजनासाठी कामगार संघटनांबरोबर बैठक 
  • १९ मार्च : ‘मुजारा लहर’ दिन साजरा करणार आणि देशभरातील बाजार समित्यांमध्ये (मंडी) अन्न महामंडळ आणि शेती वाचवा अभियानांतर्गत आंदोलन 
  • २३ मार्च : शहीद भगतसिंग यांच्या शहीद दिनानिमित्त देशभरातील युवक दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदवतील. 
  • २६ मार्च : दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच चार महिने पूर्ण होत असल्याने या दिवशी ‘भारत बंद’चे आयोजन.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT