कांदा
कांदा  
मुख्य बातम्या

कांदा दरात घसरणीने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या आठवड्यात कांदा बाजारात ४५० रुपयांपर्यंत घसरण झाली होती. सोमवारी सप्ताहाच्या प्रारंभी दर पुन्हा प्रतिक्विंटल मागे २०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.  सणाच्या तोंडावर कांद्याला सरासरी ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असताना त्यातही पुन्हा घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढलेल्या कांदा दराच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वाणिज्य व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांचा विचार केला. मात्र भाव घसरत असल्याने केंद्राचे शेतकरी कल्याण मंत्रालयासह वाणिज्य व ग्राहक व्यवहार मंत्रालय आता का विचार नाही? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.  चालू सप्ताहात बाजार समित्यांमध्ये घसरलेले क्विंटलमागील दर  (रुपयात) 

बाजार समिती दर (ता. ११) दर (ता. १४) घसरण
लासलगाव ३००१    २८००   २०१
सिन्नर  ३०००   २८००  २००
पिंपळगाव बसवंत २९०१  २८५१   ५०
मनमाड   २७५०  २७००   ५०
सटाणा   २८५०   २८००    ५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT