Farmers angry over non-purchase of maize
Farmers angry over non-purchase of maize 
मुख्य बातम्या

मका खरेदी न केल्याने संग्रामपूरमध्ये शेतकरी संतप्त 

टीम अॅग्रोवन

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत संग्रामपूर खरेदी विक्री केंद्रावर ऑनलाइन नोंदणी मधील शेतकऱ्यांची सोमवार (ता. १३) पासून मका खरेदी सुरू करण्यात आली. परंतु दुसऱ्याच दिवशी साइट बंद केल्याने खरेदी रखडली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १४) तहसीलदारांची भेट घेत निवेदन दिले. तातडीने मका खरेदी सुरू करावी, अशी मागणी केली. 

मका खरेदी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १५५ क्विटल खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या मक्याची नोंद शासनाच्या वेबसाईटवर करून तशी पावती शेतकऱ्यांना द्यावी लागते. मात्र, संबंधित साईट बंद असल्याने पावती निघणे बंद झाले. परिणामी खरेदी केलेला मका शेतकऱ्यांना परत नेण्यासाठी सांगण्यात आले. यावर शेतकरी संतप्त झाले. त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराचा निषेध करीत नोंदणी झालेला मका खरेदी करण्यात यावा, अशी मागणी केली. 

शासनाच्या निर्देशानुसार मका विक्रीसाठी तालुक्यातील जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत या केंद्रावर जागेची अडचण असल्याने मका खरेदीला विलंब झाला. खरेदी केलेला माल साठवणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते. सोमवारी (ता. १३) साठवणुकीसाठी जागा उपलब्ध होताच मका खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, नंतर पावती काढण्यात अडचणी आल्या. 

परिणामी खरेदी केलेला मका शेतकऱ्यांना परत घेऊन जा, असे सांगण्यात आले. केंद्रावर मका आणताना झालेला वाहतूक खर्च, हमाली, तोजाई व गेलेला वेळ यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मका विक्रीसाठी आणावा, असा संदेश शेतकऱ्यांना मिळाल्याने त्यांनी मका खरेदी केंद्रावर विविध वाहनातून आणला होता. मात्र, त्यांचा मका खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

आत्तापर्यंत या केंद्रावर खरेदी केलेला मका ठेवण्यासाठी जागा नव्हती. जागा उपलब्ध होताच सोमवार (ता. १३) पासून खरेदीला सुरुवात केली. परंतु साइट बंद पडल्यामुळे खरेदी केलेला मका शेतकऱ्यांना परत करावा लागला. साइट सुरू झाल्यास पुन्हा खरेदी करता येईल.  - बी. बी. निंबोळकर, व्यवस्थापक खरेदी विक्री संस्था, संग्रामपूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT