poultry
poultry  
मुख्य बातम्या

सांभाळ अशक्य झाल्याने पक्षी नष्ट करण्याची वेळ

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः कोरोना विषाणू प्रसार चिकनव्दारे होत असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्याचा खूप मोठा फटका जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. चिकनला मागणी नसल्यामुळे पक्ष्यांचा सांभाळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर पक्षी नष्ट करण्याची वेळ आली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या अफवेमुळे चिकन आणि अंडी यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. पक्षी संगोपनावर प्रतिकिलोस सुमारे ७५ रुपये खर्च येत आहे तर चिकन चे दर प्रतिकिलो ८ ते १० रुपये एवढे कमी होऊनही ग्राहकांकडून मागणी नाही. एका अंड्याचा उत्पादन खर्च ३ रुपये ८० पैसे असून मोफत दिली दिले तरी ग्राहक घ्यायला तयार नाहीत. मागच्या दोन वर्षांपासून तयार खाद्य तसेच मका सोयाबीन, तांदूळ आदी कच्चा माल तसेच औषधी, मजुरी आदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. आर्थिक अडचणीत आल्यामुळे दरेगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक लक्ष्मण जाधव पक्षी खड्डा खोदून जमिनीत गाडून टाकावी लागली. पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा ब्रॉयलर आणि लेयर पोल्ट्री व्यावसायिक लक्ष्मण जाधव, सुनील जाधव, दुर्गादास राठोड, डॉ. केशव वाघमारे, मुक्तार कुरेशी, गणेश नागरे, डॅा. सुभाष निरगुडे, प्रकाश फेगडे आदींनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT