banana
banana  
मुख्य बातम्या

केळीच्या देशी वाण संवर्धनासाठी शेतकऱ्याने घरीच तयार केली रोपे 

टीम अॅग्रोवन

अकोला ः मागील अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करणारे जिल्ह्यातील दिग्रस बुद्रूक (ता.पातुर) येथील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांनी केळीची घरीच रोपनिर्मिती सुरु केली आहे. देशी वाणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांनी या माध्यमातून केळीचे बेणे वृद्धींगत करण्याचे काम सुरु केले आहे. 

याबाबत माहिती देताना ताले म्हणाले की, साधारणपणे सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना रस्त्यांवर केळीचे कंद पडलेले दिसले होते. ते उचलून आणत त्यांनी शेतात लागवड केली. स्वतः शेतामध्ये पाच झाडे लावली. त्यापासून १०-१५ झाडे तयार केली. पुढे हीच संख्या शंभरावर पोचविली. घरी तसेच मित्रांना या झाडांवर लागलेली केळी खायला द्यायचे. त्याची चव उत्कृष्ट होती. त्यानंतर ताले यांनी २०० झाडांची लागवड केली आणि यातून तयार झालेली केळीची विक्री सुरु केली. या काळात अनेक शेतकऱ्यांनी भेटी देत केळीची मागणी केली. 

चार वर्षांपूर्वी (सन २०१६) आपण २०० झाडांचे २ प्लांट तयार केले. यात सरासरी २५ ते ३० किलो वजनाचे घड मिळू लागले. जवळपास एक लाखांचे उत्पादन आले. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या या झाडांची उत्कृष्ट चव आणि लांब व जाड आकार यामुळे मागणी वाढली. या केळीची लागवड वाढविण्याचा निश्चय करीत त्यांनी या झाडांपासून रोपे तयार करण्यासाठी बेणे कंपन्यांसोबत संपर्क केले. परंतु कंपन्यांनी बेणे तयार करण्याचे नाकारत स्वतः कडील टिश्यू कल्चरची रोपे घ्या असा सल्ला दिला. ही बाब आपणास खटकली. त्यामुळे स्वतःच केळीची रोपे आता आपण तयार करू असा निश्चय केला. यासाठी एका कृषी कंपनीतील त्यांचे मित्र सतीश म्हसकर यांनी मला घरच्या घरीच वंशवृद्धी (Propagation) पद्धतीने रोपे तयार करण्याबाबत तांत्रिक माहिती दिली. याद्वारे दोन हजार रोपे तयार करुन एक एकर केळीची बाग उभी केली आहे. 

टिश्यू कल्चरचा व त्या माध्यमांतून आणलेल्या रोपांसाठी केला जाणारा शिल्लकचा रासायनिक खर्च थांबवता येईल व कमी खर्चात लागवड करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रतिक्रिया सर्वसाधारणपणे एका डोळ्यापासून एक रोप तयार होते. पण आपण कल्पकतेने टिश्यू कल्चर तंत्रा प्रमाणेच स्वत: चे तंत्रज्ञान वापरुन एका डोळ्यांपासून २० ते २५ रोपे तयार केली. यात यश आल्याने आता उत्साह वाढला आहे. अशा प्रकारे पुढील वर्षी जास्त संख्येने रोपे तयार करणार आहे  - राजेंद्र ताले, शेतकरी.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT