farmers agitation
farmers agitation  
मुख्य बातम्या

शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसाद

टीम अॅग्रोवन

चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत शुक्रवारी (ता.२५) पंजाब, हरियानासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३१ पेक्षाही अधिक शेतकरी संघटनांनी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. शेतकऱ्यांनी विविध ठिकाणांवर रास्ता, रेल रोको आंदोलन केले. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रूळावर ठिय्या दिला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

भारतीय किसान युनियन क्रांतिकारी, किर्ती किसान युनियन, भारतीय किसान युनियन (एकता उगराहन), किसान मजदूर संघर्ष समिती आणि बीकेयू (लाखोवाल) या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला होता. पंजाबमध्ये काँग्रेस, आप आणि शिरोमणी अकाली दल अशा बड्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असून अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी पंजाबमध्ये अनेक ठिकाणांवर रास्ता रोको आंदोलन केले. अमृसतरमध्ये किसान मजदूर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. 

महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, किसान सभा, कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांनी सहभागी होत आंदोलने केली. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये शुक्रवारी आंदोलन झाले. 

पंजाब, हरियानात तीव्र आंदोलन कृषी विधेयकांविरोधात पंबाज आणि हरियानात आंदोलनाची धग जास्त होती. शुक्रवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांसह काँग्रेस, आप आणि शिरोमणी अकाली दलाने रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, रेले रोको, ठिय्या आंदोलने केले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT