Farm school on soybean crop at Pandhari
Farm school on soybean crop at Pandhari 
मुख्य बातम्या

पांढरी येथे सोयाबीन पिकाविषयी शेतीशाळा

टीम अॅग्रोवन

पांगरी ः ‘‘सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा किडीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावे. शेतात इंग्रजी ‘टी’ अक्षरासारखे पक्षी थांबे लावावे’’, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक विलास मिस्कीन यांनी शेतकऱ्यांना दिला. 

पांढरी (ता. बार्शी) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे ‘क्रॉपसॅप’संलग्न शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली. या शेतीशाळेत मिस्कीन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोयाबीन पिकावरील कीड, रोग, त्यांच्यामुळे होणारे नुकसान व त्यावरील जैविक व रासायनिक उपायांबाबत माहिती दिली. 

या शेती शाळेसाठी पोलीस पाटील एस. डी. घावटे, रवी घावटे, अच्युत घावटे, विष्णु घावटे, गणेश घावटे, कल्याण घावटे, प्रशांत घावटे, विष्णू तांबे, रणजीत घावटे, मधुकर घावटे, शिवाजी घावटे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

कृषी सहाय्यक मदन तांबारे यांनीया शेतीशाळेसाठी परिश्रम घेतले. तांबारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT