Fardad should not take cotton product: Alase
Fardad should not take cotton product: Alase 
मुख्य बातम्या

फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ नये : आळसे

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ नये,’’ असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले.

यंदा जिल्ह्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे कपाशीवरील कीड, रोगाचे व्यवस्थापन वेळेवर करता आले नाही. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

जिल्ह्यातील कपाशीची एक वेचणी पूर्ण झाली आहे.  आळसे म्हणाले, ‘‘गुलाबी बोंडअळीचे जीवन चक्र लक्षात घेता तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सद्यःस्थितीत कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या  व्यवस्थापनासाठी डोमकळ्या, बोंडे वेचून अळीसह नष्ट करावी. या अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावावे. पाच टक्के  निंबोळी अर्काची फवारणी करावी. फरदडचे उत्पादन टाळावे.’’

‘‘डिसेंबर महिन्यात शेतामध्ये कपाशीचे पीक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर तत्काळ मेंढ्या, शेळ्या, जनावरे चरण्यासाठी सोडाव्या. शेतात पऱ्हाटी रचून ठेवू नये. श्रेडरच्या सह्यायाने पऱ्हाटीचा बारीक चुरा करावा. जिनिंग मिलमध्ये  कापूस साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळे लावावे. यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे  शेतकरी फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ शकतात. परंतु, थोड्या फायद्यासाठी येत्या काळात गुलाबी बोंड अळीचे संकट वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कपाशीचे उत्पादन घेणे टाळावे’’, असे आवाहन आळसे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT