Extreme rainfall in Marathwada on the roots of kharif crops
Extreme rainfall in Marathwada on the roots of kharif crops 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या मुळावर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून अनेक भागात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस पिकांच्या मुळावर उठला आहे. आधी मुगाची नासाडी आणि आता काढणीला आलेल्या सोयाबीन, उडदाला त्याने दणका दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

पावसाच्या संततधारीने काढणीला आलेल्या मुगाचे अनेक भागात नुकसान झाले. आता उडीद, सोयाबीन भुईसपाट झाले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत नदीकाठच्या, ओढ्याकाठच्या पिकांना पुराचा फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यात इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे सुक्रे पिंपळगाव, दैठना, इंदेवाडी, भारस्वाडा, हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला पूर आला आहे. त्यामुळे सेनगाव, कळमनुरी आदी तालुक्यात पिकांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. 

उस्मानाबाद तालुक्यात कसबे तडवळेसह गोपाळवाडी, खामगाव, दुधगाव कोंबडवाडी, जवळे , रुई, तुगाव, खेड व कळंब तालुक्यातील वाघोली, सातेफळ सौंदणा, गौर, दहीफळ, सापनई या शिवारात जोरदार पाऊस पडला. लहान मोठ्या नदी नाल्या तुडुंब झाल्या. तेरणा नदी देखिल दुतर्फा भरुन वाहिली. पावसाच्या तडाख्यात उसाचे फड अक्षरशः जमीनदोस्त झाले. सोयाबीन पाण्यात बुडाले आहे.  उसाचे पावसाच्या तडाख्याने होत्याचे नव्हते झाले. मोठी हानी झाली. एका रात्रीत वर्षभरातील कष्ट मातीमोल झाले. निसर्गाने भाकरीच हिरावून घेतली.  - भागवत डोंगरे, शेतकरी सापनई, ता. कळंब  .....  शेवगळ परिसरात जोरदार पाऊस आसाच सुरू राहिला, तर सोयाबीन व कापूस ही पिके हाती लागणार नाहीत. मूग पीक हातचा गेला. आता सोयाबीन व कापूस पिकाला फटका बसला.  - संदिप लोंढे- पाटील, शेवगळ, ता. घनसावंगी, जि. जालना  ....  पंधरवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. २ एकरातील सोयाबीन काढणीला आले. पाऊस लागून बसला. त्यामुळे मोठे नुकसान झाले.  - ज्ञानोबा तिडके, पांगरी. ता, परळी, जि. बीड.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT