Extension till November 2 for application of nursery scheme in Solapur district
Extension till November 2 for application of nursery scheme in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या अर्जासाठी दोन नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन ऑक्‍टोबर ते १९ ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत दिली होती. मात्र, या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दोन नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकृतासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प स्वरूपात राबवायची आहे. यासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, शेडनेटमधील चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आणि इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणे गरजेचे आहे.

शेडनेटगृह १००० चौरस मीटरमध्ये ३.२५ मी. उंचीचे ग्रीड साईज, ६ मीटर बाय ६ मीटर सांगाडा उभारणीचा खर्च ३ लाख ८० हजार रुपये (अनुदान- एक लाख ९० हजार रुपये), पॉली टनेल १००० चौरस मीटरमध्ये प्रकल्प खर्च ६० हजार रुपये (अनुदान ३० हजार रुपये), एक पॉवर नॅपसॅक स्पेअरचा खर्च ७६०० रुपये (अनुदान ३८०० रुपये), ६२ प्लास्टिक क्रेटसचा खर्च १२ हजार ४०० रुपये (अनुदान ६२०० रुपये) असा एकूण खर्च ४ लाख ६० हजार रुपये आहे. यासाठी २ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान मिळेल. 

महिला शेतकरी, शेतकरी गटांना प्राधान्य

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची एक एकर जमीन आणि पाण्याची कायमची सोय हवी. महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

महिला शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य राहील. यानंतर भाजीपाला उत्पादक अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि शेतकरी गटांना प्राधान्य असेल. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावयाचे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT