extension for register for cotton procurement
extension for register for cotton procurement 
मुख्य बातम्या

कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

अमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शनिवार (ता.६) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी अद्याप नोंदणी न करु शकलेल्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.  कोरोनानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्रीकरिता नोंदणीच करता आली नाही. परिणामी नोंदणीला मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीचा यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. कापूस पणन महासंघाचे अनंतराव देशमुख यांच्यांशी देखील त्यांनी याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे अमरावती जिल्हयात मंगळवार (ता.२) ते शनिवार (ता.६) या कालावधीत शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. शनिवारी कार्यालयीन वेळेनंतर कापूस नोंदणी बंद करण्यात येईल, हे लक्षात घेऊन बाजार समितीस शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT