Export of 300 vehicles agricultural products  from Sangli to Mumbai, Gujarat
Export of 300 vehicles agricultural products from Sangli to Mumbai, Gujarat 
मुख्य बातम्या

सांगलीतून मुंबई, गुजरातमध्ये शेतमालाची ३०० गाड्यांची निर्यात

टीम अॅग्रोवन

सांगली : लॉकडाउन सुरू झाल्यापासून २४ मार्च ते २४ एप्रिल कालावधीत सांगली येथून मुंबई, गुजरात येथे ३०० गाड्यांतून शेतमाल गेला आहे. बाजार समितीत ४६ कोटी ४४ लाखांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘एक महिन्याच्या लॉकडाउनमध्‍ये जिल्ह्यात अत्यावश्‍यक घटकांची कमतरता भासलेली नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैयक्तिक खरेदीदारास बाजार समिती आवारात येण्यासाठी प्रतिबंध आहे. केवळ रिटेल दुकानदार त्यांच्या खरेदीसाठी येऊ शकतात.

सध्या बाजार समितीत नियमितपणे गहू, ज्वारी, तांदूळ खाद्यतेलाची विक्री सुरु आहे. येथे खेडोपाड्यातील दुकानदारांकडून धान्यासह मसाला, खाद्यतेल, आणि कडधान्यांची खरेदी होत आहे. तसेच मुंबई आणि गुजरातमधील मोठ्या व्यापाऱ्यांकडून गुळाची मागणी आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी गुळाची विक्री केली आहे.  सांगली बाजार समितीतील विक्री, उलाढाल (महिन्यातील) 

धान्य विक्री (क्विंटल) उलाढाल (लाखात) 
गहू २१,४८० ५५४.८०
तांदूळ ११,३३० ४८२.२४ 
चना डाळ ४३०६ २६१.८४ 
मसूर डाळ ५०२४ ४२१.६४ 
मूगडाळ २८६५ २७१.४१ 
तूरडाळ २७०४ १९६.२१
साखर ३२३८ १२५.९६
खाद्यतेल १८२७ २००.९३
मीठ १४४८ १४.४८
इतर धान्य मसाले ३९,६८९ १९५६ 
गूळ ४६५० १५८.२२ 
एकूण ९८,५६१ ४६४४.५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT