गोंदियात ‘झिरो टिल ड्रील’चा प्रयोग Experiment with 'Zero Till Drill' in Gondia
गोंदियात ‘झिरो टिल ड्रील’चा प्रयोग Experiment with 'Zero Till Drill' in Gondia 
मुख्य बातम्या

गोंदियात ‘झिरो टिल ड्रील’चा प्रयोग

टीम अॅग्रोवन

गोंदिया  : खरिपातील धानाची कापणी झाल्यानंतर जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात झिरो टिल ड्रिल यंत्राचा वापर केला जात आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाकरिता गोंदिया व तिरोडा तालुक्‍याची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून उत्पादकता वाढ होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. 

गोंदिया जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. त्यामुळेच या जिल्ह्याला राइस सिटी, असे म्हटले जाते. खरिपात ९५ टक्‍के क्षेत्रावर धान लागवड राहते. ज्यात हलक्‍या धानाचे प्रमाण जास्त राहते. खरिपातील धान पीक काढल्यानंतर सिंचनाची सोय असल्यास शेतकरी रब्बीची तयारी करतात.

यासाठी धानाचे खुंट काढण्यासाठी नांगरणीपासून जमिनीच्या मशागतीची पूर्ण तयारी करावी लागते. मात्र नांगरणी केल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होता व जमीन कोरडी पडते. अशात रब्बीसाठी सिंचनाची सोय असल्यास ठिक. मात्र पाण्याची सोय नसल्यास शेतकऱ्यांना ती करावी लागते. झिरो टिल ड्रिल यंत्राचा वापर, अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

जमिनीची सुपीकता वाढणार  खरिपातील धान पिकाची कापणी झाल्यानंतर नांगरणी न करता याच जमिनीत लगेच झिरो टिल ड्रिल यंत्राने पेरणी केल्यास जमिनीतील ओल्याव्याचा रब्बी पिकांना लाभ होतो व चांगले उत्पादन येते. विशेष म्हणजे धानाचे खुंट जमिनीत राहत असल्याने ते जमिनीतच कुजतात व त्यापासून उच्च प्रतीचे खत तयार होते व शेतीसाठी अत्यंत पोषक ठरते.

नेमकी हीच बाब हेरत कृषी विभागाने झिरो टिल ड्रील यंत्राच्या वापराचा प्रयोग हाती घेतला आहे. या यंत्राद्वारे खरिपातील धानाची कापणी झाल्यावर लगेच रब्बी पिकाची यंत्राद्वारे पेरणी करण्यात आली आहे. यासाठी गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्‍याची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, झिरो टिल ड्रील यंत्राद्वारे लागवडीचा प्रयोग करण्यासाठी गोंदिया व तिरोडा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कृषी अवजार निर्मात्यांकडून तीन यंत्र घेण्यात आले आहेत. त्या माध्यमातून याद्वारे सुमारे पाचशे एकरात करडई, मोहरी, हरभरा लागवड करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांचा जमीन मशागतीचा खर्च वाचला आहे.

प्रतिक्रिया झिरो टिल ड्रील यंत्राचा वापर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. रब्बीसाठी जमीन तयार करण्यासाठी खर्च वाचतो. शिवाय धानाची खुंट जमिनीत कुजून जमिनीला सेंद्रिय खत मिळते. यातून उत्पादन वाढीला फायदा होतो.   - गणेश घोरपडे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT