Experiment of Potato Cultivation on Turkmenabad Kharadi Agreement
Experiment of Potato Cultivation on Turkmenabad Kharadi Agreement 
मुख्य बातम्या

तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा लागवडीचा प्रयोग 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील तुर्कांबाद खराडी येथील स्वयंभू शेतकरी गट आणि भीमाशंकर ॲग्रो कंपनी आंबेगावच्या माध्यमातून करारावर बटाटा शेतीचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. जवळपास १५ एकरांवरील या प्रयोगात २० शेतकरी सहभागी झाले आहेत. लागवड केलेले पीक आता बहरू पाहत आहे. 

साधारणत: ऑक्‍टोबरच्या शेवटी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहभागी शेतकऱ्यांपैकी १८ शेतकऱ्यांनी बेड पद्धतीने दोन ओळींतील अंतर अडीच फूट व दोन रोपातील अंतर सहा इंच ठेवून बटाटा पिकाची लागवड केली. तर दोन शेतकऱ्यांनी जोडओळ पद्धतीने लागवडीचा पर्याय निवडत दोन जोडओळीतील अंतर एक फूट व दोन रोपातील अंतर सहा इंच ठेवून बटाटा लागवड केली. 

गंगापूर तालुक्‍यात तुर्काबाद खराडी परिसरातील हा करार पद्धतीने बटाटा लागवडीचा हा प्रयोग असल्याचे ‘आत्मा’च्या वतीने सांगण्यात आले. एक एकर बटाटा लागवडीसाठी साधारणत: ८ क्‍विंटल बेणे लागले जे २६०० रुपये प्रतिक्‍विंटलने करार करणाऱ्या पेप्सीको कंपनीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांची किटही कंपनीकडून पुरविली जाणार आहे. शिवाय उत्पादित बटाटा १४ रुपये प्रतिकिलोने कंपनीच खरेदी करणार असल्याची माहिती स्वयंभू शेतकरी गटाचे अध्यक्ष जगदीश पाटेकर यांनी दिली. या प्रयोगात सहभागी केलेल्या क्षेत्रातून एकरी किमान १२० क्‍विंटल बटाटा उत्पादन होणे अपेक्षीत असून चिप्स बनविण्यासाठी त्याचा कंपनीकडून वापर केला जाणार असल्याचेही श्री. पाटेकर म्हणाले. 

या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तारगे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे, चंद्रकांत तायडे, शिरोडीचे पोलिस पाटील तसेच स्वयंभू शेतकरी गटाचे अध्यक्ष जगदीश पाटेकर व शेतकरी प्रयत्नशील आहेत. 

प्रतिक्रिया शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणानुसार तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकरी गटांचे कंपनी सोबत करार करण्यात येत आहेत. यामध्ये भेंडी, बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न, बटाटे असे करार सध्या गंगापूर तालुक्यात आत्माच्या प्रयत्नातून सुरू आहेत. भविष्यात याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव आणि विक्रीमध्ये फायदा होईल  - दिलीप मोटे,  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, गंगापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT