विनता नदीचे अस्तित्व धोक्यात
विनता नदीचे अस्तित्व धोक्यात 
मुख्य बातम्या

विनता नदीचे अस्तित्व धोक्यात

टीम अॅग्रोवन

नाशिक  : नदीशेजारील जमिनीवर अतिक्रमणे, अवैध वाळूउपसा आणि पर्यावरण असंतुलन व प्रदूषणासह नदीत घाण व कचरा टाकला जात असल्याने निफाड येथील विनता नदीचे अस्तित्व धोक्यात आले. या नदीच्या स्वच्छता व संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी प्राधान्याने ''विनता'' नदीचे सीमांकन करा, अन्यथा भविष्यात विनता नदीचे अस्तित्व दिसणार नाही, असा इशारा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला.  निफाड नगरपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ''विनता-कादवा नदी स्वच्छता व जलसंवर्धन अभियाना''साठी निफाड येथील रोपवाटिकेमध्ये मंगळवार (ता. १०) मुक्तसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. सिंह बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि. दा. व्यवहारे यांनी केले. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, डॉ. सीमा डेर्ले, राजाभाऊ शेलार, राजेंद्र राठी, शिवाजी ढेपले, अॅड. दिलीप वाघावकर, डॉ. उत्तम डेर्ले, गोपाळ पाटील, अनिल कुंदे आदी उपस्थित होते.  या वेळी डॉ. सिंह म्हणाले, ‘‘नदीच्या जमिनीचे सीमांकन करणे ही आजची प्राथमिकता आहे. नदीचा नकाशा पाहून हे करण्यासाठी पाच लोकांची समिती तयार करावी, तीन महिन्यांत हे काम आधी हाती घेऊन शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ''आये कादवा विनता को जाने'' या उपक्रमात सहभागी करावे असे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT