Every Saturday in Washim Turmeric will be bought and sold
Every Saturday in Washim Turmeric will be bought and sold 
मुख्य बातम्या

वाशीममध्ये दर शनिवारी  होणार हळद खरेदी-विक्री 

टीम अॅग्रोवन

वाशीम ः हळदीचे उत्पादन घेण्यात विदर्भात आघाडीवर असलेल्या वाशीम जिल्ह्यात रिसोड वगळता हळद विक्रीची सुविधा नव्हती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत आता हळदीचे दर शनिवारी लिलाव केले जाणार आहेत. या हळद लिलावाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.  हळदी लिलावावेळी शेतकरी नवनाथ पांडुरंग ठाकरे (रा. सुपखेला) यांनी माल विक्रीला आणला होता. त्यांचा या निमित्त बाजार समितीच्या वतीने मुख्य प्रशासक सुरेश मापारी व बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे तसेच बाजार समितीचे निरीक्षक वामन आनंदराव सोळंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्‍घाटनाच्या दिवशी हळदीला ८२०१ रुपये प्रति क्विंटल, असा दर मिळाला.

या वेळी उपस्थित बाजार समितीचे निरीक्षक रा. वि. वानखेडे, पर्यवेक्षक जगदिश बुंधे, लिपिक राहुल चव्हाण, माधव गोटे, हर्षवधन खंडारे, मोहन भालेराव, तसेच हि. र. रजानिवाले व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोयर, ज्ञानेश्वर जाधाव, दत्ताराव वानखेडे, पंडीत सरनाईक, योगेश सारडा, गोविंद बियाणी, अमित बियाणी, गजानन धामणे, गोपाल कासट, मोहन ठाकरे आदी या वेळी उपस्थित होते.  वाशीममध्ये हळदीचा बाजार सुरू झाल्याने जिल्ह्यातील उत्पादकांना आता स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाली आहे. या पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी हळद विक्रीसाठी मराठवाड्यातील बाजारपेठांवर अवलंबून होते. आता त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचू शकेल, असा विश्‍वास बाजार समितीतर्फे व्यक्त करण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT