देशात इथेनॉल पुरवठा ७१ टक्क्यांनी वाढणार
देशात इथेनॉल पुरवठा ७१ टक्क्यांनी वाढणार 
मुख्य बातम्या

देशात इथेनॉल पुरवठा ७१ टक्क्यांनी वाढणार

वृत्तसेवा

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये केल्या जाणाऱ्या इथेनॉल मिश्रणाच्या पुरवठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७१ टक्क्यांनी वाढ होणार अाहे. तेल कंपन्यांनाकडून यासाठी तब्बल ११३ कोटी लिटर इथेनाॅलची मागणी राहील. यामुळे साखर कारखान्यांना २०१७-१८ मध्ये चार हजार ५०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी कारखान्यांचे अार्थिक उत्पन्न वाढणार असून, थकबाकीसह इतर बिले देण्यास मदत होणार अाहे, अशी माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) गुरुवारी (ता. ७) दिली.

इथेनॉलच्या दरात ५ टक्क्यांनी सुधारणा झाली अाहे. त्यात यंदा उसाची उपलब्धतता अधिक राहिल्याने मोलॅसिस उत्पादनात वाढ होणार अाहे. परिणामी, मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या निर्मितीला चालना मिळाली अाहे. यंदाच्या वर्षात इथेनॉल खरेदीसाठी तेल कंपन्यांनी निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर साखर कारखान्यांनी १५५ कोटी लिटर इथेनॉल विक्रीसाठी निविदा सादर केल्या होत्या. त्यात ११३ कोटी लिटर इथेनॉलपुरवठा करण्यावर शिक्कामोर्तब झाले, असे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी तेल कंपन्यांकडून त्याची खरेदी केली जाते. गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये (डिसेंबर ते नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी ६६ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी केली होती. त्याअाधीच्या वर्षी (२०१५-१६) १११ कोटी लिटर इथेनाॅल खरेदी करण्यात अाली होती. अाता यंदा त्यात अाणखी वाढ होणार अाहे.

११३ कोटी लिटर इथेनॉलच्या खरेदीचा दर प्रतिलिटर सरासरी ४०.८५ रुपये निश्चित केला अाहे. यामुळे कारखान्यांना ४,५०० कोटी रुपये मिळणार अाहे. पहिल्या टप्प्यात अधिक इथेनॉलपुरवठा होणार अाहे. अाता दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेत अाणखी इथेनॉल पुरवण्याची संधी कारखान्यांना मिळेल, अशी अपेक्षा ‘इस्मा’ने व्यक्त केली अाहे.

महाराष्ट्राला संधी उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून सर्वाधिक ४४.३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होणार अाहे. त्यापाठोपाठ ४०.३ कोटी लिटर इथेनॉल महाराष्ट्रातील कारखाने पुरविणार अाहेत. यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ९.६ टक्के, महाराष्ट्रात ८.६ टक्के अाणि बिहारमध्ये ७ टक्के एवढे अाहे. यंदा ऊस उत्पादन चांगले राहण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कारखान्यांना चांगली संधी राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अशी आहेत कारणे

  •  गेल्या वर्षाच्या तुलनेत इथेनॉल खरेदी दरात ५ टक्क्यांनी वाढ
  •  प्रमुख राज्यांमध्ये यंदा ऊस उपलब्धतेचे प्रमाण चांगले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT