The erosion season of eighteen factories in Marathwada, Khandesh was over
The erosion season of eighteen factories in Marathwada, Khandesh was over 
मुख्य बातम्या

मराठवाडा, खानदेशातील अठरा कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील १८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकल्यात जमा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे गाळप व साखरेचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी जवळपास ८८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. तर, जवळपास २१ कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला होता. 

औरंगाबाद येथील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला होता. आपल्या क्षमतेच्या तुलनेत चालू न शकलेल्या या १८ कारखान्यांपैकी बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम फेब्रुवारी व मार्च महिन्यातच उरकला. नंदुरबार जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांनी ७ लाख ४३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करताना १०.२५ टक्के साखर उताऱ्याने सात लाख ६१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 

जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने १ लाख ४३ हजार ५९२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर, सरासरी १०.६८ च्या साखर उतारा १ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी ५ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप, तर ५ लाख २५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन सरासरी ९.५% साखर उतारा राखत केले. जालना जिल्ह्यातील ४ साखर कारखान्यांनी १२ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर, १३ लाख ३७ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन १०.८० साखर उतारा राखत केले.  बीड जिल्ह्यात ५ कारखान्यांचे गाळप 

बीड जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी यंदा गाळप केले. त्यांनी १० लाख २३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९ लाख १२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर, सरासरी ८.९१ टक्के साखर उतारा राखला. पाचही कारखान्यांनी सरासरी ९.७४ टक्के, तर खासगी कारखान्यांनी १०.५ टक्के साखर उतारा राखल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT