Empower service organizations in the city: Revenue Minister Thorat
Empower service organizations in the city: Revenue Minister Thorat 
मुख्य बातम्या

नगरमधील सेवा संस्थांना ताकद द्या ः महसूलमंत्री थोरात

टीम अॅग्रोवन

नगर ः सेवा संस्था या सहकाराचा कणा आहेत. त्यांना ताकद दिली पाहिजे. अध्यक्ष, सचिव, संचालकांच्या बैठका घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत मार्गदर्शन करा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची ६३वी सभा ऑनलाइन पद्धतीने आज बॅंकेच्या सहकार सभागृहात झाली. त्या वेळी मंत्री थोरात बोलत होते. व्यासपीठावर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, संचालक भानुदास मुरकुटे, तसेच अन्य संचालक उपस्थित होते. संचालक प्रशांत गायकवाड ऑनलाइन उपस्थित होते.

थोरात म्हणाले, की बॅंकेवर ठेवीदारांचा विश्‍वास असल्यानेच सुमारे आठ हजार कोटींच्या ठेवी आहेत. या रकमेचे नियोजन करून शेतकऱ्यांचे हित सांभाळा. बॅंकेत एक संशोधन विभाग असावा. वसुलीची गती वाढवावी. सध्याची संचालक मंडळाची टीम चांगली आहे.

मंत्री तनपुरे म्हणाले, की महावितरण कंपनी अडचणीत आहे. सुमारे ७० हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सुमारे ६० ते ७० टक्के सूट दिली जात आहे. त्यासाठी जिल्हा बॅंकेने कर्जयोजना राबवावी.

प्रास्ताविकात अध्यक्ष शेळके यांनी बॅंकेच्या ताळेबंदाची माहिती दिली. ३०० एटीएम, मोबाईल ॲप, ऑनलाइन सेवा आदी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. प्रारंभी कानवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. संचालक करण ससाणे, गणपतराव सांगळे यांनी विषयांचे वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनीही बॅंकेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. उपाध्यक्ष कानवडे यांनी आभार मानले.

काही संचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. माजी संचालक सबाजी गायकवाड, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांनी मुद्दे मांडले. कृषिभूषण सबाजी गायकवाड यांनीही सभेत बॅंकेचे लक्ष वेधले. ‘‘बॅंकेतील काही शाखांतील कर्मचारी नीट बोलत नाहीत. पाच मिनिटे उशीर झाला तरीही कॅश घेत नाहीत,’’ असे आरोप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT