Eligible 159 applications for Pune District Bank
Eligible 159 applications for Pune District Bank 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा बँकेसाठी १५९ अर्ज पात्र

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे आणि ज्ञानेश्वर दाभाडे बिनविरोध झाले आहेत. दाखल उमेदवारी अर्जाची ८ डिसेंबरपासून माघारी घेण्यास सुरुवात झाली आहे.

पहिल्याच दिवशी बारामती तालुका मतदारसंघातून सतीश काकडे काकडे यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध झाले आहेत. येत्या २२ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. मंगळवारी (ता.७) छाननी झालेल्या अर्जामध्ये १३ अर्ज बाद झाले असून, १५९ अर्ज पात्र ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.   निवडणुकीत १७२ उमेदवारांनी एकूण २९९ अर्ज दाखल केले होते. छाननीअंती पुरंदर आणि भोरमधील ‘अ’ वर्ग तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्या ठिकाणी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, घोषणेची औपचारिकता बाकी आहे. यामध्ये पुरंदरमधून काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. तसेच आंबेगावमधून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ही बिनविरोध निवडून आले आहे. मावळमधून ज्ञानेश्वर दाभाडे यांचीही बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. पुरंदर ‘अ’ वर्ग तालुका सोसायटी मतदार संघात सहकारी संस्थेतील अनुभवाचा दाखला संस्थेच्या लेटरहेडवर जोडलेला नाही व शिक्का नसल्याने प्रकाश पवार यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. त्यामुळे केवळ संजय जगताप यांचाच अर्ज राहिला आहे. भोर तालुका ‘अ’ वर्ग विकास सोसायटी मतदार संघातील उमेदवार ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी संचालक अनुभवाचा दाखला जोडलेला नसल्यामुळे त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांचाच एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे चारही उमेदवारांच्या विजयाची घोषणा बाकी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT