Eleven thousand 447 quintals Purchase of gram from NAFED
Eleven thousand 447 quintals Purchase of gram from NAFED 
मुख्य बातम्या

लातूर : ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची ‘नाफेड’कडून खरेदी

टीम अॅग्रोवन

लातूर : जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रांत ‘नाफेड’तर्फे ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. ७१३ शेतकऱ्यांचा हा हरभरा असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांनी दिली. 

जिल्ह्यात ५१०० रुपये प्रतिक्‍विंटल या किमान आधारभूत किमतीने हरभऱ्याच्या खरेदीसाठी १६ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामध्ये लातूर, उदगीर, औसा, चाकूर, अहमदपूर, रेणापूर, हलकी, भोपानी, हलसी, लोणी, शिरूर ताजबंद, साताळा, सेलू, देवणी, शिंदगी व खरोळा या केंद्राचा समावेश आहे.

या सर्व केंद्रांत आतापर्यंत १४ हजार ५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ७२७१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी एसमएस पाठविण्यात आले. तर ६७८४ शेतकऱ्यांना अजूनही संदेश पाठविणे बाकी आहे. ७१३ शेतकऱ्यांचा ११४४७ क्‍विंटल ६० किलो हरभरा खरेदी करण्यात आला. देय्य रक्‍कम ५ कोटी ८३ लाख ८२ हजार ७६० रुपये इतकी होते. त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपयांची देय रक्‍कम प्राप्त झाली आहे. त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सुमठाणे म्हणाले. 

औरंगाबादमध्ये प्रतिसाद नाही

औरंगाबाद जिल्ह्यात ७ केंद्रे सुरू करण्यात आली. तेथून २४६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ५ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचा संदेश पाठविला. परंतु एकाही केंद्रावर प्रत्यक्ष खरेदीला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती औरंगाबादच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.

जालन्यात २३६३ क्‍विंटल खरेदी

जालना जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी ९ केंद्रे सुरू करण्यात आली. यापैकी ७ केंद्रांत ३८५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १७४७ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी १७० शेतकऱ्यांकडील २३६३ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ही खरेदी मंठा व भोकरदन या दोन केंद्रांत झाली, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT