शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे शनिवारी वितरण
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे शनिवारी वितरण 
मुख्य बातम्या

शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे शनिवारी वितरण

टीम अॅग्रोवन

पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) योजनेत उल्लेखनीय कार्य केलेल्या बाजार समित्यांना शनिवारी (ता.२३) सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. शेतीमाल तारणा योजनेसाठी एक, दोन आणि तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे १ लाख १ हजार, ५१ हजार आणि २५ हजार रुपये असे, तर ई नामसाठी ५ लाख, ३ लाख आणि २ लाख रुपये पुरस्कारांचे स्वरूप असणार आहे.  शेतीमाल तारण योजनेत २०१७-१८ मध्ये १३० बाजार समित्यांनी सहभाग घेत, ५ हजार शेतकऱ्यांचा २ लाख क्विंटल शेतीमाल तारणातून ४० कोटी रुपये तारण कर्ज दिले होते. यंदा फेब्रुवारी २०१९ अखेर १४० बाजार समित्यांनी सहभाग घेत सुमारे ९ हजार शेतकऱ्यांचा ३ लाख ७१ हजार क्विंटल शेतीमालातून ७४ कोटी ९३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.  तसेच आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) योजना २०१६ पासून राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत ६० बाजार समित्यांमध्ये ९ लाख ५० हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, ४० लाख क्विंटल शेतीमालाचा आॅनलाइन लिलाव करण्यात आली आहे. याद्वारे मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर १ हजार १०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. शेतीमाल तारण पुरस्कार

क्रमांक अ वर्ग ब वर्ग क-ड वर्ग
प्रथम धामणगाव रेल्वे मोर्शी (अमरावतील) गोंडपिंपरी (चंद्रपूर)
द्वीतीय अमरावती गडचिरोली  
तृतीय सोलापूर भिवापूर (जि. नागपूर) पोंभुर्णी (जि. चंद्रपूर)

ई नाममध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या बाजार समित्या क्रमांक --- बाजार समिती प्रथम --- परभणी द्वितीय ---दौंड तृतीय --- कोल्हापूर उत्तेजनार्थ --- वर्धा उत्तेजनार्थ -- नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT