Due to increase in stocks in Khandesh, cotton, It's time to dump her and move on
Due to increase in stocks in Khandesh, cotton, It's time to dump her and move on 
मुख्य बातम्या

खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी खरेदी बंद करण्याची वेळ

टीम अॅग्रोवन

जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे पासून सुरू आहे. या खरेदीची गती सध्या संथ झाली आहे. अनेक खरेदी केंद्रांमध्ये कापूस व सरकीचा साठा वाढल्याने खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्‍यातही खरेदी संथ असल्याची तक्रार शेतकरी व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे. कापूस महामंडळाचे (सीसीआय) खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार, जळगावमधील बोदवड, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), भुसावळ, चोपडा, जळगाव, पाचोरा येथे खरेदी केंद्र सुरू होते. यातील जळगाव व इतर दोन केंद्रे कापसाचा साठा वाढल्याने आणि मजूरटंचाईमुळे बंद करण्यात आली आहेत. 

‘सीसीआय’च्या केंद्रात लॉकडाउनच्या काळात सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर, पणन महासंघानेदेखील आपल्या धुळे, मालेगाव (जि.नाशिक), धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल येथील केंद्रांमध्ये लॉकडाऊनच्या काळात मिळून एक लाख ५१ हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी केली आहे. परंतु, ‘सीसीआय’ची खरेदी बोदवड, जळगाव, जामनेर, पाचोरा भागात संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्याची विक्री केव्हा होईल? याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.  चुकारे अप्राप्तच 

लॉकडाऊनच्या काळात पणन महासंघ व ‘सीसीआय’च्या केंद्रांत जेवढ्या कापसाची खरेदी झाली, त्यापोटी एकाही शेतकऱ्याला चुकारे (पैसे) प्राप्त झालेले नाहीत. पणन महासंघ व ‘सीसीआय’च्या औरंगाबाद येथील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचारी कमी संख्येने येतात. तसेच औरंगाबादमधील संबंधित बॅंकांमध्येही कोरोनामुळे अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT